सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत भारतीय संघाने मालिका आपल्या नावे केलीये. मंगळवारी (24 जानेवारी) मालिकेतील अखेरचा सामना इंदोर येथे खेळला जाईल. या मालिकेत भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याच्यावर विशेष लक्ष असेल. कारण, विराटने मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात फारशी चांगली कामगिरी केली नाही. त्याच मुद्द्यावर भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर याने आपले मत व्यक्त केले.
विराट कोहली हा या मालिकेआधी चांगल्या फॉर्ममध्ये दिसून येत होता. त्याने मागील चार डावात तीन शतके झळकावलेली. मात्र, त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध त्याची बॅट काहीशी थंडावली. पहिल्या सामन्यात आठ तर दुसऱ्या सामन्यात केवळ 11 धावांमध्ये तो माघारी परतला. महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही सामन्यात तो डावखुरा फिरकीपटू मिचेल सॅंटनरचा बळी ठरला. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
विराटच्या याच छोट्याशा बॅडपॅचविषयी बोलताना जाफर म्हणाला,
“विराट लवकर बाद झाल्यामुळे नक्कीच निराश असेल. ही फारशी चिंता करण्यासारखी गोष्ट नाही. तिसऱ्या सामन्यात तो नक्कीच पुनरागमन करत मोठी खेळी करेल. मात्र, विराट चांगल्या फिरकीपटूं पुढे काहीसा असहज वाटतो हे स्पष्ट दिसत आहे. मागील काही काळात आदिल रशीद व ऍडम झंपा यांनी त्याला बरेचसे तंग केले. त्यानंतर त्याने सॅंटनरसमोर संघर्ष केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आधी तो या सर्वांवर नक्कीच मात करेल.”
विराट इंदोर वनडेनंतर टी20 मालिकेत खेळणार नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी तयारीचा पुरेसा वेळ त्याच्याकडे असेल. या मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे सुरू होईल.
(Wasim Jaffer Said Virat Wil Back In Form In Indore ODI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रणजी सोडा आणि बुधवारपर्यंत रांचीत पोहोचा, पृथ्वी शॉसह ‘या’ खेळाडूंना बीसीसीआयचा आदेश
“सूर्या आणि बटलर कुठेही धावा करू शकतात,” स्वतः दिग्गज गोलंदाजानेच केलं कौतुक