भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली सध्या त्याच्या जुन्या रंगात दिसत आहे. विराट काही महिन्यांपूर्वी त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब काळातून जात होता. पण आता परिस्थितीत पूर्णपणे बदलल्याचे दिसत आहे. टी-20 विश्वचषक 2022 च्या पहिल्याच सामन्यात विराटने पाकिस्तानविरुद्ध वादळी खेळी केली आणि सर्वाचे लक्ष वेधले. सध्या सर्वात्र च्याचे कौतुक होत आहे. अशातच ऑस्ट्रेलिया माजी दिग्गज ऍडम गिलक्रिस्ट देखील कोहलीला भेटल्यानंतर चांगलाच प्रभावित झाल्यासारखा दिसत होता.
भारत आणि पाकिस्तान संघाने एकमेकांविरुद्धच्या सामन्याने टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) ची सुरुवात केली. भारताने हा सामना 4 विकेट्स राखून जिंला. तर विराट कोहली (Virat Kohli) भारताच्या विजयचा खऱ्या अर्धाने शिल्पकार ठरला. विराटने या सामन्यात अवख्या 53 चेंडूत 154.72 च्या स्ट्राईक रेटने 82 धावांची नाबाद खेळी केली होती. विराटची ही खेळी अनेकांच्या मते त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी होती. जगभरातील दिग्गज त्याच्या या प्रदर्शानंतर कौतुक करत आहेत. आता ऍडम गिलक्रिस्ट (Adam Gilchrist) देखील विराटचे प्रदर्शन पाहून खुश असल्याचे दिसते. विराट आणि गिलक्रिस्टचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेचे माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन (Dale Steyn) देखील दिसत आहे.
गुरुवारी भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर गुरुवारी (27 ऑक्टोबर) रोमांचल लढत पाहायला मिळाली. या सामन्यापूर्वी विराट कोहली आणि एडम गिलक्रिस्ट यांची मैदानात भेट झाली. डेल स्टेन आणि ऍडम गिलक्रिस्ट सध्या विश्वचषकाच्या कॅमेंट्री पॅनलचा भाग आहेत. यो दोघांनीही विराटचे कौतुक केल्याचे व्हिडिओत पाहायला मिळाले. यादरम्यान, गिलक्रिस्टने विराटच्या खांद्यावर कौतुकाची थाप देखील दिली.
Gilchrist meets Kohli and he seems impressed🙌🏼 pic.twitter.com/BciNf1jV6h
— Kanav Bali🏏 (@Concussion__Sub) October 27, 2022
दरम्यान, नेदरलँड्सविरुद्धच्या या सामन्यात देखील विराट भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने 44 चेंडूत नाबाद 62 धावा केल्या. भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी संघासाठी अर्धशतके केली आणि धावसंख्या 179 पर्यंत पोहोचवली. प्रत्युत्तरात नेदरलँड्स संघ जेव्हा फलंदाजीला आला, तेव्हा एकापाठोपाठ विकेट्सची रांग लागली. नेदरलँड्सचा एकही फलंदाज 20 धावांचा टप्पा पार करू शकला नाही. नेदरलँड्सने मर्यादित 20 षटकांमध्ये 9 विकेट्सच्या नुकसानावर 123 धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मोहम्मद वसीम टी-20 विश्वचषकातील त्याच्या पहिल्याच सामन्यात जिंकले मन, केली पाहण्यासारखी गोलंदाजी
स्वत:पासून लांब असलेला चेंडू बाबरने चित्त्याची चपळाई दाखवत झेलला, व्हिडिओ पाहाच