विजयाची घोडदौड कायम राखण्यासाठी आणि आयपीएल 2024 मधील दुसऱ्या विजयासाठी मैदानात उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला शुक्रवारी (दि. 29) पराभवाचा सामना करावा लागला. आरसीबीच्या 183 धावांचे आव्हान केकेआर संघाने 7 विकेट आणि 19 चेंडू राखून पुर्ण केले. घरच्याच मैदानावर बंगळुरू संघाला धक्कादायक पराभव पाहावा लागला. आरसीबी संघाच्या स्वप्नांची धुळधाण उडवण्यात सर्वात मोठा वाटा होता तो व्यंकटेश अय्यर याचा. ( Watch KKR Venkatesh Iyer smashes monstrous 106 meter six against RCB )
कोलकाताच्या विजयाचा पाया व्यंकटेश अय्यर यानेच रचला. त्याने 30 चेंडूत 50 धावा केल्या. व्यंकटेशच्या या धुवांधार फलंदाजीमुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाचा विजय सोपा झाला. बंगळुरुचे एम. चिन्नास्वामी स्टेडियम फलंदाजीसाठी सोपं समजलं जातं. त्यामुळेच सुरुवातीला विराट कोहलीने तुफान फलंदाजी केली होती. परंतू कोलकाताच्या फलंदाजांनी त्याहून सरस फलंदाजी केली. आरसीबी विरुद्ध केकेआर यांच्यातील ह्या सामन्यात मैदानावर चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. त्यातही 2024 च्या आयपीएलमधील सर्वात लांब षटकार देखील सर्वांना पाहायला मिळाला आणि तो देखील व्यंकटेश अय्यर याच्या बॅटमधून.
व्यंकटेश अय्यरचा चेंडू थेट स्टेडियम बाहेर –
केकेआरचा फलंदाज व्यंकटेश अय्यर याने आरसीबी विरोधात अर्धशतक झळकावले. व्यंकटेशने 30 चेंडूत 50 धावा केल्या. त्यामध्ये त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारले. व्यंकटेशच्या या 3 षटकारात त्याने 9 व्या ओव्हरमध्ये मयंक डागरला 106 मीटर लांब सिक्स मारला. व्यंकटेश अय्यरने अत्यंत जोरदार फटका मारत हा चेंडू मिडविकेटच्या वरुन थेट स्टेडियमच्या बाहेर पाठवला. यंदा मुंबईच्या ईशान किशनने सनरायजर्स हैदराबाद विरोधातील मॅचमध्ये 103 मीटरचा सिक्स मारला होता. त्यापेक्षाही व्यंकटेशचा हा षटकार सरस ठरला.
— Bangladesh vs Sri Lanka (@Hanji_CricDekho) March 29, 2024
अधिक वाचा –
– विराटच्या वादळी अर्धशतकामुळे बंगळुरूने उभारला धावांचा डोंगर! कोलकाताला जिंकण्यासाठी 183 धावांची गरज । RCB vs KKR
– “ले-ले, ले-ले भाई, लास्ट है”, डीआरएससाठी खलील अहमदची वारंवार विनंती, ऋषभ पंतनं काय केलं? जाणून घ्या
– तो क्रिजवर येताच गोलंदाज थरथर कापायचे!…वीरेंद्र सेहवाग आजच्याच दिवशी बनला होता ‘मुलतानचा सुलतान’