इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) १५ व्या हंगामाची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. तत्पुर्वी या हंगामाचा मेगा लिलाव पार पडला. या लिलावात अनेक खेळाडूंवर बोली लावण्यात आली, तर अनेक दिग्गजांवर कोणत्याच फ्रॅंचायझीने बोली लावली नाही. यावर्षीच्या आयपीएल हंगामात ८ नाही तर १० संघ खेळताना दिसणार आहेत. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) या हंगामात वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे.
प्रत्येकवेळी प्रमाणे यावर्षी देखील त्याने केसांची रचना वेगळ्या पद्धतीने केली आहे. आयपीएल हंगामांच्या सुरुवातील धोनीने अनेकदा त्याच्या केसांची रचना बदलली आहे. यावेळीही तो वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाला तीन वेळा आयपीएल ट्राॅफी मिळवून देणारा ४० वर्षीय धोनी यावेळी देखील सीएसकेला ट्राॅफी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहे.
𝐴𝑏ℎ𝑎𝑟𝑎 Surat! Those eyes that smile with 💛 give us the joy, everywhere we go! #SingamsInSurat #WhistlePodu 🦁 pic.twitter.com/T8xwHjoqeI
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 7, 2022
सीएसकेचा कर्णधार धोनीने १५ ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. धोनीच्या सांगण्यानुसार सीएसके संघाने आयपीएलच्या सरावाचा कॅंम्प सूरतमध्ये लावला आहे.
The Hi 👋 we have been waiting for!🤩 Day 1⃣: 🏏#WhistlePodu #SingamsInSurat 🦁 pic.twitter.com/WgvSPK43Sy
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 6, 2022
आयपीएलच्या ट्वीटर आकाऊंटवर एका जाहिरातीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये धोनी बस चालवताना दिसत आहे आणि बसमधील लोकांना क्रिकेट सामना दाखवत दिसत आहे. महेंद्र सिंग धोनीचा हा नवा लूक सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. आयपीएलच्या आकाऊंटवरुन शेअर केलेल्या या व्हिडीओला १० हजारांहून अधिक लाइक्स आल्या आहेत.
When it's the #TATAIPL, fans can go to any extent to catch the action – kyunki #YehAbNormalHai!
What are you expecting from the new season?@StarSportsIndia | @disneyplus pic.twitter.com/WPMZrbQ9sd
— IndianPremierLeague (@IPL) March 4, 2022
धोनीची ही शेवटची आयपीएल असणार आहे. सीएसकेने २०२१ मध्ये अंतिम सामन्यात केकेआर संघाला पराभूत करत आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते. आयपीएल लिलावापूर्वी सीएसके संघाने रविंद्र जडेजा, एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली यांना संघात कायम ठेवले होते. सीएसकेने चेन्नई ऐवजी सूरतमध्ये आयपीएलच्या सरावाचा कॅम्प लावला आहे. या लिलावात सीएसकेने दीपक चहर, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, डेव्हॉन कॉन्वे, रविंद्र जडेजा, शिवम दुबे या खेळाडूंना विकत घेतले आहे.
आयपीएलच्या १५ व्या हंगामासाठी १० संघ खेळणार असून हे संघ १२ मार्चपासून सरावाला सुरुवात करणार आहेत. आयपीएलचे सर्व सामना मुंबई आणि पुण्याच्या ४ स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. प्ले ऑफच्या सामन्यांसाठी ठिकाण निश्चित झालेले नाही. आयपीएलचे वेळपत्रक जाहीर झाले असून पहिला सामना केकेआर आणि सीएसके या संघांमध्ये खेळवला जाणार आहे. अंतिम सामना २६ मार्चला पार पडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
लकी लेडी! बड्डेदिनी विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणारी जगातील पहिली क्रिकेटपटू, केलेत अनेक विक्रम
महिला दिन विशेष : खेळाची मैदाने गाजवणाऱ्या रणरागिणी