---Advertisement---

व्हिडिओ: बिग बॅश लीगमध्ये मुजीब उर रेहमानची कमाल, घेतली शानदार हॅटट्रिक

---Advertisement---

सध्या ऑस्ट्रेलिया बिग बॅश लीग ही स्पर्धा सुरू आहे. ब्रिस्बेन हीट आणि होबार्ट हरिकेन्स संघात बुधवारी (30 डिसेंबर) सामना झाला. या सामन्यात होबार्ट हरिकेन्स संघाने 1 धावेने ब्रिस्बेन हीट संघावर विजय मिळवला. या सामन्यात मुजीब उर रहमानने हॅटट्रिक घेतली.

या सामन्यात होबार्ट हरिकेन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 19.4 षटकात सर्वबाद 150 धावसंख्या उभारली होती. यामधे सर्वाधिक जास्त धावा मलान याने केल्या होत्या. त्याने 32 चेंडूचा सामना 4 चौकार आणि 1 षटकार यांच्या मदतीने 39 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर टीम डेविडने 17 चेंडूत 36 धावा केल्या आणि इंग्रामने 21 चेंडूत 24 धावा केल्या. ब्रिस्बेन हीट संघाकडून मुजीबने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर बार्टलेटने 2 विकेट्स प्राप्त केल्या.

मुजीब उर रहमानने घेतली हॅटट्रिक

अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू मुजीब उर रहमानने या सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन केले. ब्रिस्बेन हीट संघासाठी खेळताना त्याने होबार्ट हरिकेन्स संघाविरुद्ध हॅटट्रिकची नोंद केली. त्याने ब्रिस्बेन हीट संघाकडून गोलंदाजी करताना 19 व्या षटकात हा कारनामा केला.

त्याने आपल्या या षटकाच्या पहिल्या चेंडूवर किमो पॉलला त्रिफळाचीत केली. त्यांच्यानंतर दुसरा चेंडू वाईड टाकला. त्याबरोबर लगेच पुढच्या चेंडूवर विल पार्करला त्रिफळाचीत केले. यानंतर त्याने आपल्या षटकातील तिसर्‍या चेंडूवर स्कॉट बोलँडला त्रिफळाचीत केले. अशा प्रकारे त्याने बिग बॅश लीगमध्ये आपल्या हॅटट्रिकची नोंद केली.

https://twitter.com/cricketcomau/status/1344275381050720258

मुजीबने 15 धावा देताना 5 विकेट्स घेतल्या

मुजीब उर रहमानने आपल्या कोट्यातील 4 षटके गोलंदाजी करताना दमदार कामगिरी केली. त्याने या सामन्यात 15 धावा देताना 5 विकेट्स घेतल्या. त्याच्या या शानदार कामगिरीमुळे ब्रिस्बेन संघाने होबार्ट हरिकेन्स संघाला 150 धावांवर रोखले.

या सामन्यात ब्रिस्बेन हीट संघाने 19. 4 षटकात सर्वबाद 149 धावा केल्या. त्यामुळे होबार्ट हरिकेन्स संघाचा 1 धावेने विजय झाला. ब्रिस्बेन हीट संघाकडून सर्वाधिक जास्त धावा बेझलीने केल्या. त्याने 31 चेंडूचा सामना करताना 4 चौकार आणि 2 षटकार ठोकत नाबाद 49 धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर मॅक्सने 21 चेंडूचा सामना करताना 3 चौकार आणि 1 षटकार ठोकत 32 धावांचे योगदान दिले. मात्र तरी सुद्धा ब्रिस्बेन हीट संघाचा एक धावेने पराभव झाला.

होबार्ट हरिकेन्स संघाकडून रिलेने 21 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर स्कॉटने 18 धावा देताना 2 विकेट्स मिळवल्या. तसेच पॉल आणि नॅथनने प्रत्येकी एक विकेट घेत संघाच्या विजयात योगदान दिले.

महत्वाच्या बातम्या:
– ब्रेकिंग: भीषण अपघातातून बालंबाल बचावले मोहम्मद अझरुद्दीन, गाडीचा झाला चक्काचूर
– थोडेथोडके नाही, तर तब्बल ११ वर्ष ५ महिन्यांनंतर या क्रिकेटरने केलंय दुसरं कसोटी शतक
– सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत श्रीसंतचा सहभाग निश्चित, खास कॅप्शन देत शेअर केला व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---