आशिया चषक 2022 मधील तिसरा सामना अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात झाला. या सामन्यात अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंनी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीतही चमकदार खेळ दाखवत 7 विकेट्सने सामना जिंकत सुपर-4 फेरीत प्रवेश केला. या सामन्याचा खरा शिल्पकार राहिला डावखुरा फलंदाज नजीबुल्लाह झादरान.
झादरानने बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh vs Afghanistan) महत्त्वपूर्ण सामन्यात अफगाणिस्तानसाठी फिनिशरची (Match Finisher) भूमिका निभावली. त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत खालच्या फळीत 17 चेंडूत नाबाद 43 धावांची वादळी खेळी केली. त्याच्या या खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून 1 चौकार आणि 6 षटकार निघाले. या 6 षटकारांपैकी एक षटकार नेत्रदीपक राहिला.
हा झादरानच्या (Najibullah Zadran) 6 पैकी चौथा षटकार होता. अफगाणिस्तानच्या डावातील अठराव्या षटकात त्याने हा षटकार खेचला. बांगलादेशचा गोलंदाज मोहम्मद सैफुद्दीनच्या अठराव्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने चपळतेने षटकार ठोकला. सैफुद्दीनने शॉर्ट बॉल टाकत झादरानला फसवण्याचा प्रयत्न केला. परंतु झादरानने पुल आणि स्कूप शॉटचे (Najibullah Zadran Six) मिश्रण करत जबरदस्त फटका मारला. चेंडू वेगाने आपल्याकडे येत असल्याचे पाहात त्याने खेळपट्टीवर उडी घेतली आणि फाइन लेगवर जबरदस्त षटकार ठोकला. त्याच्या या षटकाराला पाहून दर्शकांसहित समालोचकही चकित झाले होते.
सैफुद्दीनचे हे षटक सामन्याचा कायापालट करणारे षटक ठरले. या षटकात झारदान आणि एब्राहिम झादरान यांनी मिळून 2 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 22 धावा जमवल्या आणि संघासाठी विजय सोप्पा बनवला.
https://twitter.com/rishabh2209420/status/1564661107616145408?s=20&t=91AbbBXscRimMKoDrkLRjw
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने निर्धारित 20 षटकात 7 विकेट्सच्या नुकसानावर 127 धावा केल्या. या डावात बांगलादेशकडून मोसद्देक हसनैन याने चिवट झुंज दिली. त्याने 31 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या. या डावात बांगलादेशकडून मुजीब उर रेहमान आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने एब्राहिम झादरान आणि नजीबुल्लाह झादरान यांच्या खेळींच्या जोरावर 18.3 षटकातच सामना जिंकला. एब्राहिमने नाबाद 42 धावा केल्या.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पदार्पणात पाकिस्तानची ‘सळो की पळो’ करून सोडणाऱ्या ‘या’ अष्टपैलूची वयाच्या 36व्या वर्षी निवृत्ती
एकेकाळी काट्याची टक्कर देणाऱ्या हाँगकाँगविरुद्ध भारत करणार प्रयोग! अशी असेल प्लेइंग इलेव्हन
पाकिस्ताननंतर हाँगकाँगची बारी; कधी, कुठे, कसा पाहाल सामना? संभाव्य इलेव्हनवरही टाका नजर