---Advertisement---

Video: चेन्नईविरुद्ध विजयानंतर दिल्ली संघात फुटबॉल फिवर, रोनाल्डोच्या ट्रेडमार्क सेलिब्रेशनची पदार्पणवीर पटेलकडून कॉपी

On: मंगळवार, ऑक्टोबर 5, 2021 11:25 PM
---Advertisement---

सोमवारी(४ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ च्या ५० व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जचा दोन चेंडू आणि तीन गडी राखून पराभव केला. दुबईतील सामना जिंकल्यानंतर दिल्लीचा संघ आयपीएल २०२१ च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर १३७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. सीएसके गोलंदाजांनी सर्वोत्तम प्रयत्न केले, पण दिल्लीला विजयापासून रोखू शकले नाही. यासह, दिल्ली कॅपिटल्सचा संघ आयपीएल २०२१ गुणतालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे.

चेन्नईने दिलेल्या १३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवनने शानदार सुरुवात केली. त्यानंतर सीएसकेने काही गडी बाद करून जोरदार पुनरागमन केले, पण हेटमायर चेन्नईच्या विजयाआड उभा राहिला आणि दिल्लीला विजय मिळवून दिला. चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू खूप आनंदी दिसत होते.

चेन्नईविरुद्धच्या सामन्यात आयपीएलमध्ये पदार्पण करणारा रिपल पटेलने ड्रेसिंग रूममध्ये दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोच्या ट्रेडमार्क सेलिब्रेशनची कॉपी करतांना दिसला. मार्कस स्टॉयनिस आणि कागिसो रबाडा ड्रेसिंग रूममध्ये जोरजोरात हसताना दिसले, तर अक्षर पटेल अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माची चेष्टा करताना दिसला. हा व्हिडिओ दिल्ली कॅपिटल्सच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

दिल्ली कॅपिटल्सचे सध्या १३ सामन्यांत २० गुण झाले आहेत. या पराभवानंतर चेन्नई संघ १८ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.

सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत म्हणाला की, संघाला हा विजय कठोर संघर्षानंतर मिळाला आहे. रिषभ पंत म्हणाला, ‘ही वाढदिवसाची भेट म्हणता येणार नाही, हा एक कठीण सामना होता. आम्ही स्वतःसाठी तो खूप कठीण केला, पण शेवटी आम्ही जिंकलो आता सर्व ठीक आहे.’ दिल्ली कॅपिटल्स संघ शुक्रवारी(८ सप्टेंबर) आरसीबीविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Video: आनंदाचा क्षण! पदार्पणापूर्वी हैदराबादने दिलेले गोड सरप्राईज पाहून उम्रान मलिकला आनंदाश्रू अनावर

“तुम्ही गोष्टी सहजतेने घेताय”; गावसकरांनी विश्वचषकासाठी निवड झालेल्या ‘या’ खेळाडूंना सुनावले खडेबोल

अरेरे! विश्वचषकासाठी निवड झालेला ‘हा’ खेळाडू झाला दुखापतग्रस्त; बीसीसीआय झाली चिंतित

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---