जम्मू -काश्मीरमधील आणखी एका क्रिकेटपटूने आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. २१ वर्षीय उम्रान मलिकने रविवारी सनरायझर्स हैदराबादकडून कोलकाता नाईट रायडर्स बेंगलोर विरुद्ध पहिला सामना खेळला. पदार्पण सामन्यात मलिकने आपल्या वेगाने सर्वांना प्रभावित केले. त्याने सातत्याने १४० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने गोलंदाजी केली. त्याच्या तीन चेंडूंचा वेग तर १५० किमी प्रतितासापेक्षा जास्त होता. दरम्यान, पदार्पणाच्या सामन्यापूर्वी मलिकला हॉटेलच्या खोलीत संघाने सूंदर सरप्राईज दिले होते.
हैदराबाद संघाने मोठ्या पडद्यावर उम्रान मलिकच्या कुटुंबातील सदस्यांचा एक व्हिडिओ सादर केला, ज्यात ते सर्व मलिकला शुभेच्छा देत होते. हा व्हिडिओ सादर झाल्यानंतर मलिकला आपले अश्रू आवरणे जड झाले. त्याने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. मलिकचा सहकारी रशिद खानने हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. ज्यात ही सगळी दृश्य कैद झाली.
उम्रान मलिकने पदार्पण सामन्यात सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये केकेआरच्या फलंदाजांना खूप त्रास दिला. त्याने केकेआरच्या फलंदाजांना बांधून ठेवले होते. त्याने त्याचा सर्वात वेगवान चेंडू १५१.०३ किलोमीटर प्रति तास वेगाने टाकला. या हंगामात सर्वात वेगवान चेंडू टाकणारा भारतीय आहे. त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध चार षटकांत २७ धावा दिल्या.
https://twitter.com/rashidkhan_19/status/1445035706057834507
मलिकने यावर्षी जम्मू -काश्मीरसाठी टी -२० आणि लिस्ट ए पदार्पण केले होते. त्याने बंगालविरुद्ध लिस्ट ए सामन्यात आपल्या पदार्पणात विकेट घेतली. नेट बॉलर म्हणून मलिक आधीच हैदराबाद संघाचा भाग होता.
सोमवारच्या (४ ऑक्टोबर) सामन्यात हैदराबादला कोलकाताकडून पराभवाला स्वीकारावा लागला. नाणेफेक जिंकल्यानंतर हैदराबादने फलंदाजीचा निर्णय घेतला. हैदराबादला २० षटकांत आठ गडी गमावून केवळ ११५ धावा करता आल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरने १९.४ षटकांत चार गडी गमावत ११९ धावा करून सामना जिंकला. केकेआरकडून शुभमन गिलने ५७ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
“तुम्ही गोष्टी सहजतेने घेताय”; गावसकरांनी विश्वचषकासाठी निवड झालेल्या ‘या’ खेळाडूंना सुनावले खडेबोल
अरेरे! विश्वचषकासाठी निवड झालेला ‘हा’ खेळाडू झाला दुखापतग्रस्त; बीसीसीआय झाली चिंतित
थालाचा मास्टरक्लास! धोनीशी चर्चा करताना दिसले पंत, अश्विनसह दिग्गज खेळाडू, फोटो भन्नाट व्हायरल





