भारतीय संघाचे काही खेळाडू सध्या बेंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (National Cricket Academy) सराव करत आहेत. यामध्ये सलामीवीर फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan), वेगवान गोलंदाज खलील अहमद (Khaleel Ahmed) आणि चायनामन फिरकीपटू गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांचा समावेश आहे.
यादरम्यान शनिवारी (22 फेब्रुवारी) धवनने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये धवन खलील आणि कुलदीप या आपल्या संघसहकाऱ्यांसोबत जिममध्ये वर्कआऊट सोडून डान्स करताना दिसत आहे.
https://www.instagram.com/p/B83TFqgH8L6/?utm_source=ig_web_copy_link
धवनने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओला कॅप्शन देत लिहिले की, “देसी बॉयझ…! वर्कआऊट आणि डान्स करणे ही एक सुखद भावना आहे. याला अधिक आनंदी बनवा. तुम्हा सर्वांचा वीकेंड (शनिवार आणि रविवार) चांगला जावो!”
धवन भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज असून कित्येक वेळा तर तो सामन्यादरम्यानच डान्स करताना दिसतो. पण सध्या तो दुखापतीमुळे भारतीय संघाबरोबर न्यूझीलंड दौऱ्याला गेलेला नाही. तो या दुखापतीनंतर एनसीएमध्ये सराव करत आहे.
त्याचबरोबर कुलदीप देखील भारताच्या कसोटी संघाचा भाग नसल्याने तो न्यूझीलंड दौऱ्यातील वनडे मालिका संपल्यानंतर भारतात परतला.
ऐकावं ते नवलच! चक्क गाय मैदानात शिरल्याने रणजी सामन्यात आला व्यत्यय https://t.co/4WRY0vwsya#म #मराठी #cricket #ranjitrophy
— Maha Sports (@Maha_Sports) February 23, 2020
काय सांगता! भारत-न्यूझीलंड कसोटीदरम्यान स्टेडियममध्ये उपस्थित होता ख्रिस गेल https://t.co/yNJkfN4G5H#म #मराठी #cricket #INDvsNZ
— Maha Sports (@Maha_Sports) February 23, 2020