कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएल स्पर्धेच्या १४ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध ५ विकेट्स राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने ४ विकेट्च्या नुकसानावर १६१ धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआरने हे लक्ष्य अवघ्या १६ षटकांमध्ये गाठले. ऑस्ट्रेलियन दिग्गज पॅट कमिन्सच्या दमदार खेळीमुळे केकेआरला सहज विजय मिळाला. विजय मिळाल्यानंतर आंद्रे रसलने मैदानात डान्स केला.
ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने सामन्यात अवघ्या १४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने एकूण १५ चेंडू खेळले आणि यामध्ये नाबाद ५६ धावा केल्या. संघाला मिळालेल्या या विजयानंतर वेस्ट इंडीजचा आद्रे रसल (Andre Russell) कमिन्सच्या चारी बाजूंनी नाचू लागला. मागच्या सामन्यात रसलने केकेआरला विजय मिळवून दिला होता, पण या सामन्यात तो काही कमाल दाखवू शकला नाही. पण कमिन्सने मारलेल्या विजयी षटकारानंतर त्याने उत्कृष्ट डान्स स्टेप्स दाखवल्या.
Pat Cummins finishes things off in style!
Also brings up the joint fastest half-century in #TATAIPL off 14 deliveries.#KKR win by 5 wickets with 24 balls to spare.
Scorecard – https://t.co/22oFJJzGVN #KKRvMI #TATAIPL pic.twitter.com/r5ahBcIWgR
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2022
याचसोबत केकेआर संघाचा मालक बॉलिवुड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh khan) याने माकडाच्या डान्सचा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, “जर मी देखील नाचू शकलो असतो तर…!” पण नंतर त्याने हे ट्विट डिलीट केले. तसेच नंतर मस्त असं ट्वीट करत खेळाडूंचा जिंकल्यानंतरचा फोटो शेअर केला.
Wow again!!! @KKRiders boys!! pic.twitter.com/ctt0ZQ7vVC
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 6, 2022
दरम्यान, सामन्यात केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वात आधी नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सन १६२ धावांचे लक्ष्य उभे केले. १५ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या ८३ होती. पण नंतर सूर्यकुरमार यादव (३६ चेंडूत ५२) आणि तिलक वर्माने (२७ चेंडूत ३८ धावा) चांगला खेळ दाखवत अपेक्षित धावसंख्येपर्यंत संघाला घेऊन गेले. कायरन पोलार्डने खेळलेल्या ५ चेंडूत संघाला तब्बल २२ धावा मिळवून दिल्या.
केकेआरसाठी पॅट कमिन्सव्यतिरिक्त त्यांचा सलामीवीर फलंदाज वेंकटेश अय्यरने (४१ चेंडूत ५० धावा) अर्धशतकी खेळी केली. केकेआरचे वरच्या फळीतील फलंदाज नियमित अंतराने बाद होते गेले आणि संघ अडचणीत दिसू लागला होता, पण तितक्यात कमिन्सने मैदानात आगमन केले आणि धमाका सुरू केला.
कमिन्स मैदानात आल्यानंतर सर्व समीकरणे बदलली. त्याने चार चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद ५६ धावांची खेळी केली. दरम्यान, चालू हंगमातील केकेआरला मिळालेला हा तिसरा विजय आहे, तर एका सामन्यात संघाला पराभव पत्करावा लागला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
MI vs KKR| नितीश राणा अन् जसप्रीत बुमराहला महागात पडली चूक; झाली मोठी कारवाई