भारतात सध्या इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम सुरु आहे. या हंगामातील मुंबई आणि चेन्नई या ठिकाणावरील सामने रविवारी (२५ एप्रिल) संपले. आता पुढील २ आठवडे आयपीएलमधील एकूण १६ सामने अहमदाबाद आणि दिल्ली येथे होतील. त्यामुळे आता अनेक संघ आपल्या पुढील सामन्यांसाठी अहमदाबाद आणि दिल्लीकडे रवाना झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्स संघ देखील सोमवारी (२६ एप्रिल) दिल्लीला रवाना झाला आहे.
चेन्नई संघ दिल्लीला रवाना
खरंतर यंदा कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे आयपीएलचे आयोजन वेगळ्या प्रकारे करण्यात आले आहे. ज्यामध्ये प्रत्येक संघ बायो-बबलमध्ये असताना साखळी फेरीदरम्यान केवळ ३ वेळा प्रवास करणार आहे, ज्यामुळे कोरोना व्हायरसचा धोका कमी होईल. तसेच कोणताही संघ आपल्या घरच्या मैदानावर सामने खेळणार नाही.
त्यामुळे यंदा चेन्नई संघाचे पहिले ५ सामने मुंबईत पार पडले आहे. त्यानंतर चेन्नई साखळी फेरीतील पुढील सामने दिल्ली, बंगळुरु आणि कोलकाता येथे खेळणार आहे. चेन्नईचे पुढील ४ सामने दिल्ली येथे पार पडणार आहेत. दिल्लीतील चेन्नईचे २ सामने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहेत. तर अन्य २ सामने मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहेत.
त्यामुळे सोमवारी चेन्नईचा संघ दिल्लीला रवाना झाला. या प्रवासादरम्यानचे त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये दिसते की चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीसह चेन्नई संघाची अन्य सदस्य तसेच खेळाडूंचे कुटुंबिय पीपीई कीट घालून मास्क घालून हा प्रवास करत आहेत.
प्रेक्षकांविना होत आहेत सामने
सध्या कोरोना व्हायरसचा प्रभाव पाहाता आयपीएलचे सामने प्रेक्षकांविना खेळवले जात आहेत. तसेच सर्व संघांचे सर्व सदस्य बायो-बबलमध्ये आहेत. त्याचबरोबर बायो-बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सर्व खेळाडूंना ७ दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीला सामोरे जावे लागले होते. तसेच सर्व सदस्यांची नियमितपणे कोरोना चाचणीही होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये भीतीचं वातावरण”
मोठ्या मनाचा माणूस! कोरोना संकटात पुणेकरांच्या मदतीला धावला हरभजन सिंग, केली ‘ही’ मोलाची मदत
कौतुकास्पद! एकीकडे परदेशी खेळाडू माघार घेत असताना पॅट कमिन्स आला भारतातील कोरोनाग्रस्तांच्या मदतीला