आशिया चषक 2022 मध्ये हाँगकाँगविरुद्धचा ‘करा वा मरा’ सामना जिंकत पाकिस्तानने सुपर-4 साठी पात्रता मिळवली आहे. शुक्रवारी (02 सप्टेंबर) शारजाहच्या मैदानावर पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग संघांची लढत झाली होती. या सामन्यात पाकिस्तानने हाँगकाँगवर निर्विवाद वर्चस्व गाजवले आणि तब्बल 155 धावांच्या फरकाने हा सामना जिंकला. पाकिस्तानच्या या सामना विजयात मोहम्मद रिझवानइतकाच खुशदील शाह याचाही वाटा राहिला.
खुशदीलने (Khushdil Shah) हाँगकाँगविरुद्ध 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी (PAKvsHK) करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. एकीकडे पाकिस्तानला खुशदीलच्या रूपात नवा धाकड फलंदाज मिळाला असून, दुसरीकडे भारतीय संघासाठी ही धोक्याची घंटा असेल. कारण रविवारी (04 सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) संघ पुन्हा सुपर-4 मध्ये भिडणार आहेत.
खुशदील शाहचा धुमाकूळ
हाँगकाँगविरुद्ध खुशदीलने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 2 बाद 193 धावा केल्या होत्या. पाकिस्तानला ही मोठी धावसंख्या उभारून देण्यात खुशदीलचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला होता. त्याने चौथ्या क्रमांकावर 15 चेंडूत नाबाद 35 धावा फटकावल्या होत्या. या खेळीदरम्यान त्याने 233.33 च्या स्ट्राईक रेटने 5 षटकार मारले होते. या 5 पैकी 4 षटकार त्याने एकापाठोपाठ एका चेंडूवर मारले होते.
हाँगकाँगचा गोलंदाज एजाज खान हा डावातील विसावे षटक टाकायला आला होता. त्याच्या या षटकातील तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या अशा सलग 4 चेंडूंवर खुशदीलने षटकार मारले आहेत. त्यातही शेवटच्या षटकात त्याने षटकार मारल्याने त्याला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे.
. . 6️⃣ 5wd 6️⃣ 6️⃣ 6️⃣
Unreal striking from @KhushdilShah_ in the 20th over 🔥 #AsiaCup2022 | #PAKvHK pic.twitter.com/T1briscQa2
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 2, 2022
खुशदीलचा फॉर्म भारतासाठी चिंतेती बाब
खुशदील नुकताच फॉर्ममध्ये परतला असल्याने ही भारतासाठी चिंतेची बाब ठरू शकते. कारण आता सुपर-4 मध्ये रविवारी (04 सप्टेंबर) पाकिस्तान संघ भारताशी भिडणार आहे. यापूर्वीही साखळी फेरीत भारत आणि पाकिस्तान असा सामना झाला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 विकेट्सने झुकवले होते. त्यामुळे आता पाकिस्तानचा संघ या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरेल. अशात भारताविरुद्ध खुशदीलची बॅट तळपल्यास त्याला रोखणे अवघड होईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
उधारीची बूटे अन् अमर्यादित कष्ट! पाकिस्तानी घातक गोलंदाजाचा रोमांचक प्रवास उलघडला
VIDEO: पाकिस्तानी संघाने केली टीम इंडियाची नक्कल! दरियादिली दाखवल्यानंतरही होत आहेत ट्रोल
‘दादा’ची दादागिरी सुरू होण्यापूर्वीच संपली! ‘या’ कारणामुळे गांगुलीने घेतली एलएलसीमधून माघार