---Advertisement---

जिम सेक्शनमध्ये अश्विनने केली पुजाराच्या व्यायामाची नक्कल; Video जोरदार व्हायरल

On: शनिवार, नोव्हेंबर 28, 2020 7:51 PM
---Advertisement---

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर आहे. एका बाजूला भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. सोबतच दुसर्‍या बाजूला वनडे संघात स्थान नसलेले बाकी खेळाडू टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात सराव करत आहेत. यामध्ये भारतीय संघाचा विश्वासू फलंदाज चेतेश्वर पुजारा इतर खेळाडूंसोबत जिम सेक्शनमध्ये व्यायाम करत होता, तेव्हा आर अश्विनही त्याच्या व्यायामाची नक्कल करू लागला. यादरम्यानचा त्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

पुजारा जेव्हा डंबेलने व्यायाम करत होता, तेव्हा त्याच्या मागे उभा राहून अश्विन डंबेलविना पुजाराच्या व्यायामाची नक्कल करत होता. पुजाराने या प्रसंगाचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवरच्या स्टोरीवर शेअर केला होता.

पुजाराने हा व्हिडिओ शेअर करताना लिहले, ‘शिष्य गुरूची नक्कल करताना.’ यासोबतच त्याने हसणारा ईमोजीही शेअर केला आहे.

https://twitter.com/pant_fc/status/1332554536108507136

भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू होणार्‍या आगामी कसोटी मालिकेत पुजाराकडून खूप अपेक्षा आहेत. मागील वेळेस जेव्हा भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीवर पहिल्यांदा कसोटी मालिकेत 2-1 या फरकाने पराभूत केले होते, तेव्हा पुजाराने येथे सर्वाधिक 521 धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

Video – भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेदरम्यान डेविड वॉर्नरचे साऊथ इंडियन गाण्यावर थिरकले पाय

ऑस्ट्रेलियन खेळाडूने बांधली हार्दिकच्या बुटाची लेस, व्हिडिओ व्हायरल

ऐकावे ते नवलंच! मुलाला बाद दिले म्हणून एका पंचाने दिली दुसऱ्या पंचाला धमकी

ट्रेंडिंग लेख-

आयपीएलमध्ये धावांसाठी वणवण करणारे ३ ऑस्ट्रेलियन भारताविरुद्ध पहिल्या वनडेत ‘सुपरहिट’

भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना ‘या’ ४ धुरंधरानी ठोकलेत वनडेत वेगवान शतके

भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ‘या’ तीन कारणामुळे पराभव पहावा लागला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---