‘फिरकीचा जादूगार’ म्हणून ओळखला जाणारा शेन वाॅर्न (Shane Warne) आता आपल्यामध्ये राहिलेला नाही. शुक्रवारी (४ मार्च) रात्री त्याचे निधन झाले. त्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. वॉर्नचे चाहते त्याच्या क्रिकेट सामन्याचे अनेक जुने व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. शनिवारी सकाळपासूनच मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) बाहेर वॉर्नच्या चाहत्यांची गर्दी झाली होती. मैदानाबाहेरील वॉर्नच्या मोठ्या पुतळ्यासमोर चाहते बिअर, सिगारेट, पुष्पगुच्छ आणि फुले अर्पण करताना दिसले. आता अभिनेता शाहरुख खान आणि शेन वॉर्नचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
शेन वॉर्नने शुक्रवारी वयाच्या ५२ व्या वर्षी थायलंडमध्ये अखेरचा श्वास घेतला. वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वॉर्न बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला गोलंदाजी करताना दिसत आहे, तर अनुभवी सुनील गावसकर पंचाच्या भूमिकेत मैदानाच्या मध्यभागी उभे आहेत.
एका युजरने लिहिले की, हा व्हिडिओ २०११ च्या आयपीएलमधील आहे. व्हिडिओमध्ये, शाहरुख वॉर्नने नेटमध्ये मारलेला कव्हर ड्राईव्ह शॉट खेळत आहे, शाहरुखने चौकार मारला आहे आणि पंच गावसकर आहेत. शाहरुख आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सचा सह-मालक आहे. केकेआरच्या सामन्यांदरम्यान तो अनेकदा स्टेडियममध्ये दिसला आहे. कर्णधार म्हणून शेन वॉर्नने राजस्थानला आयपीएलचे पहिले विजेतेपद मिळवून दिले.
Throwback to IPL 2011
When Shane Warne bowled to Shah Rukh Khan and Sunil Gavaskar was the umpire..
Good ol IPL days ❤️ pic.twitter.com/15onHXdWXH
— Vinesh Prabhu (@vlp1994) March 4, 2022
शेन वॉर्नच्या निधनानंतर भारतापासून ते पाकिस्तानपर्यंतच्या खेळाडूंनी मैदानावर त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी रावळपिंडी स्टेडियमवर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एक मिनिट मौन पाळले. वॉर्नला श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व खेळाडू काळ्या पट्ट्यासह खेळण्यासाठी मैदानात उतरले. दुसरीकडे मोहालीतही भारत आणि श्रीलंकेच्या खेळाडूंनी पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एक मिनिट मौन पाळून वॉर्नला श्रद्धांजली वाहिली. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत वॉर्न दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर एकूण ७०८ कसोटी विकेट्स आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी! साहाला धमकावणाऱ्या पत्रकाराचं नाव शेवटी कळलंच; बीसीसीआय देणार उत्तरे
रोहित-विराट यांच्यात आहे का वाद? हा व्हिडिओ पाहून मिळेल उत्तर