बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात बुधवार,1 आॅगस्टपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर इंग्लंडने 9 बाद 285 धावा केल्या आहेत.
या सामन्यात इंग्लंडला रोखण्यात फिरकी गोलंदाज आर अश्विनने मोठी भूमिका बजावली. त्याने २७ षटकांत ७ षटके निर्धाव टाकत ४ विकेट्स घेतल्या.
परंतु या सामन्यातील जर कोणता टर्निंग पाईंट ठरला असेल तर तो होता कर्णधार कोहलीने इंग्लंडचा कर्णधार जो रुटला केलेले धावबाद.
जेव्हा जो रुट ८० धावांवर खेळत होता तेव्हा हे धावबाद नाट्य घडले. आर अश्विन जेव्हा भारतासाठी ६३वे षटक टाकत होता तेव्हा तिसऱ्या चेंडूवर हे नाट्य घडले.
यावेळी सेलिब्रेशन करताना कोहलीने प्रथम फ्लाइंग किस दिला आणि लगेच बॅट ड्रॉपसारखे हावभाव केले. यावेळी तो माईक ड्राॅप असे म्हणताना कॅमेऱ्यावर स्पष्ट दिसले.
याचे कारण म्हणजे लीड्स वनडेत शतक साजरे केल्यावर जो रुटने बॅट ड्रॉप सेलिब्रेशन केले होते. त्याने हातातील बॅट हवेत आडवी उंच नेऊन खाली सोडून दिली होती.
Mic drop. Celebrate. Root's a hoot! #ENGvIND pic.twitter.com/qc2Vu04B7f
— Common Sense (@AmarBantwal) July 17, 2018
विशेष म्हणजे त्याने ही कृती कर्णधार विराट कोहलीसमोर केली होती. याची मोठी चर्चा सोशल मीडियावर तेव्हा झाली होती. ही वनडे मालिका इंग्लंड २-१ने जिंकला होता.
काल जेव्हा रुटला कोहलीने बाद केले तेव्हा त्याने त्या घटनेचा एकप्रकारे असं सेलिब्रेशन करुन वचपाच काढला आहे.
https://twitter.com/Nikhil23594/status/1024854277632667649
https://twitter.com/Udiit_Panwar/status/1024823121839251458?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1024823121839251458&ref_url=http%3A%2F%2Fwww.india.com%2Fhindi-news%2Fsports-hindi%2Fwatch-virat-kohli-responds-to-joe-root-bat-drop-with-his-own-mic-drop-moment-during-edgbaston-test%2F
बॅट ड्राॅप सेलिब्रेशन म्हणजे नक्की काय-
जेव्हा एखादा मोठा गायक मोठ्या कान्सर्टमध्ये परफार्म करतो तेव्हा शेवटी तो माईक हवेतून जमिनीवर सोडतो. याला माईक ड्राॅप असे म्हटले जाते. अगदी काही देशांच्या नेत्यांनीही आपल्या शेवटच्या भाषणानंतर माईक ड्राॅप सेलिब्रेशन केले आहे.
यावरुन प्रेरीत होत जो रुटने जेव्हा वनडे मालिकेत शतक केले तेव्हा बॅट ड्राॅप सेलिब्रेशन केले. विशेष म्हणजे त्याने याबद्दल नंतर माफी मागितली तसेच माझ्याकडून ते अनवधानाने झाले असेही सांगितले होते.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–जो रुटने केला भारताविरुद्ध हा मोठा पराक्रम
–भज्जीच्या या दोन फोटोमध्ये काय आहे नक्की फरक?
–पहिल्याच कसोटी सामन्यात आर अश्विनचा खास विक्रम