---Advertisement---

पहा व्हिडिओ- गेलचे धमाकेदार शतक आणि युवराजचा गंगनम स्टाईल डान्स

On: शुक्रवार, एप्रिल 20, 2018 5:29 PM
---Advertisement---

मोहाली। आज किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात पार पडलेल्या सामन्यात पंजाबने 15 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात ख्रिस गेलने शतकी खेळी करून पंजाबच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली.

त्याचबरोबर त्याने त्याची मुलगी ख्रिसलियानाला तिच्या वाढदिवसाची खास भेट म्हणून हे शतक तिला समर्पित केले आहे. तिचा उद्या(20एप्रिल) दुसरा वाढदिवस आहे.

काल जेव्हा त्याने हे शतक केले तेव्हा डगआउटमध्ये बसलेल्या युवराज सिंगने गंगनम स्टाईल डान्स करुन गेलला दाद दिली. युवराज बराच वेळ त्याच्या शतकावर नृत्य करताना दिसला.

गेलचे हे आयपीएलमधील ६वे तर टी२० क्रिकेटमधील २१ वे शतक होते. हे शतक गेलसाठी अनेक अर्थांनी खास ठरले.

युवराज सिंग आणि ख्रिस गेल हे पंजाबच्या संघांचे भाग असून दोन्ही खेळाडूंना त्याच्या मूळ किंमतीत पंजाबने संघात घेतले आहे. त्यात ख्रिस गेलला दोन सामन्यात संधी मिळाली असून त्याने त्याचे सोने केले आहे तर युवराज मात्र फाॅर्मशी झगडताना दिसत आहे.

विडीओ-

महत्त्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment