हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष क्रिकेट संघाने 2023ची चांगली सुरूवात केली. भारताने घरच्या मैदानावर श्रीलंकेचा टी20 मालिकेत 2-1 असा पराभव करत वर्षातील पहिली मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. शनिवारी (7 जानेवारी) राजकोटमध्ये झालेल्या मालिका निर्णायक तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने श्रीलंकेचा 91 धावांनी पराभव केला. यामध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar YAdav)याने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीतील तिसरे शतक ठोकले. सामन्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याचे खूप कौतुक केले आहे.
राहुल द्रविड (Rahul Dravid) सूर्यकुमारचा खेळ 19 वर्षाखालील क्रिकेटपासून पाहत आलो आहे. तेव्हा आणि आताच्या त्याच्या फलंदाजीत झालेला बदल पाहून भारताचे मुख्य प्रशिक्षकही हैरान झाले आहेत. द्रविड म्हणाले, “मला पूर्णपणे विश्वास आहे की जेव्हापासून तुम्ही फलंदाजीला सुरूवात केली असेल तेव्हा मला फलंदाजी करताना पाहिले नसेल.” यावर सूर्यकुमार हसला आणि म्हणाला, “असे नाही, मी तुमची फलंदाजी पाहिली आहे.”
“सूर्यकुमार तुम्ही खरचं इतरांपेक्षा वेगळे आहात. तुझा फॉर्म पाहून मी नेहमीच विचार करतो ती याच्यापेक्षा चांगली टी20 खेळी मी आजवर पाहिली नाही. तुम्ही आम्हाला नेहमी वेगळे काही शॉट्स दाखवता,” असेही द्रविड पुढे म्हणाले. या दोघांची मुलाखत बीसीसीआयने त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर शेअर केली आहे.
सूर्यकुमारने 2021मध्ये भारताकडून पदार्पण केले. टी20 स्पेशालिस्ट असलेल्या या स्फोटक फलंदाजीने 2022मध्ये एका वर्षात 1000 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय टी20 धावा करणारा इतिहासातील केवळ दुसराच फलंदाज ठरला होता. तसेच त्याने 68 षटकारही मारले होते. एवढे षटकार एका वर्षात कोणीच मारले नव्हते.
https://twitter.com/BCCI/status/1611952502265761793?s=20&t=njITBxDiwBS5otC7hHMHbQ
तिसऱ्या टी20मध्ये भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली होती. यामध्ये भारताने राहुल त्रिपाठीच्या झटपट आणि सूर्यकुमारच्या स्फोटक खेळीने 5 विकेट्स गमावत 228 धावसंख्या उभारली. त्रिपाठीने 16 चेंडूत 35 आणि सूर्यकुमारने 51 चेंडूत नाबाद 112 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या गोलंदाजांनी कमाल केली. त्यांनी श्रीलंकेला 16.4 षटकात 137 धावसंख्येवरच सर्वबाद केले. यामध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स अर्शदीप सिंग याने घेतल्या. त्याने2.4 षटकात 20 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ISL 2022-23: संडे ब्लॉकबस्टर्समध्ये मुंबई सिटीसमोर केरळा ब्लास्टर्सचे आव्हान
पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या एकेरीचा नेदरलँडचा टॅलन ग्रीक्सपूर विजेता