भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला. भारताचे 12 वर्षांनंतर विश्वचषकाचा किताब जिंकण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले. ऑस्ट्रेलिया संघाने अहमदाबादमध्ये भारताला 6 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. भारत अंतिम सामन्यात अपेक्षेनुसार प्रदर्शन करू शकला नाही. पराभवानंतर भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे दिसली. काही खेळाडू तर चक्क रडूही लागले होते. अशात भारताच्या पराभवानंतर माजी खेळाडू गौतम गंभीर याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
सामन्याचा आढावा
भारतीय संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 10 विकेट्स गमावत फक्त 240 धावाच करू शकला. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ट्रेविस हेड (Travis Head) याच्या 137 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर 43 षटकात 4 विकेट्स गमावत 241 धावा केल्या. तसेच, सहाव्यांदा विश्वचषक (World Cup 2023) किताब जिंकला. भारताच्या 2011 विश्वविजेत्या भारतीय संघाचा सदस्य गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढवला.
‘आपण एक चॅम्पियन संघ’
गौतम गंभीरने ट्वीट (एक्स) करत म्हटले की, “जसे मी म्हणालो आहे की, आपण एक चॅम्पियन संघ आहोत, तेव्हा मान उंच ठेवा खेळाडूंनो… ऑस्ट्रेलियाला खूप खूप शुभेच्छा!”
As I’ve said we are a champion team irrespective. So chin up boys….Many many congrats to Australia!
— Gautam Gambhir (Modi Ka Parivar) (@GautamGambhir) November 19, 2023
रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने अंतिम सामन्यात विराट कोहली (54) आणि केएल राहुल (66) यांनी अर्धशतके केली. मात्र, यादरम्यान भारतीय संघाने भरपूर चुका केल्या, ज्याचा फायदा ऑस्ट्रेलिया संघाने घेतला.
भारतीय खेळाडूंचे अश्रू
पराभवानंतर रोहित शर्मासह मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांच्याही डोळ्यात अश्रू तरळले. रोहित डोळ्यात अश्रू घेऊन मैदानातून निघून गेला. तसेच, ग्लेन मॅक्सवेलने जसा सिराजच्या चेंडूवर विजयी शॉट मारला, तसा भारतीय गोलंदाज ढसाढसा रडू लागला. यावेळी जसप्रीत बुमराह याने त्याचे सांत्वन केले. (we are a champion team irrespective so chin up team india says gautam gambhir after aus defeat india icc world cup final 2023)
हेही वाचा-
‘तुझं रडणं मनाला लागलं, पण तू…’, रोहितचा मान खाली घालून चालतानाचा व्हिडिओ पाहून हळहळला चाहता; पाहा
ICC स्पर्धेत कोहलीचे चालणे भारतासाठी धोकादायक! आकडेवारी पाहून तुम्हीही म्हणाल, ‘विराट तू अजिबात रन करू नको’