शुक्रवारी (24 जानेवारी) ईडन पार्क (Eden Park), ऑकलँड (Auckland) येथे भारताने न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना 6 विकेट्सने जिंकला (Won by 6 Wickets). तसेच मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. हा सामना पाहण्यासाठी भरपूर चाहते आले होते.
त्यामुळे हा सामना झाल्यानंतर भारतीय संघाच्या चाहत्यांच्या उपस्थितीची भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) प्रशंसा केली होती. तसेच यावेळी विराटने जेट लॅगबद्दलही आपले मत व्यक्त केले होते.
जेट लॅगवर बोलताना विराट म्हणाला की, “आम्ही सामना सुरू होण्याच्या 2 दिवसांपूर्वी येथे (न्यूझीलंड) पोहोचलो. प्रेक्षकांनी येथे आमचे स्वागत केले. भारतीय संघात आम्ही कधीच जेट लॅगबद्दल चर्चा करत नाहीत. आम्ही हा सबब म्हणून वापरू इच्छित नाही. आमचे पूर्ण लक्ष फक्त विजय मिळवण्यावर असतो. आम्ही तेच करतो जे विजयासाठी महत्त्त्वाचे आहे.”
“त्याचबरोबर आम्हाला येत्या सामन्यांबद्दल विश्वास आहे. कारण मागील वर्षी आम्ही आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे,” असेही विराट यावेळी म्हणाला.
“आम्हाला या सामन्यातील चाहत्यांची उपस्थिती मायदेशातील सामन्याप्रमाणे वाटली. यामध्ये 80 टक्के लोक आमचे समर्थन करत होते. जेव्हा तुम्ही 200 पेक्षा जास्त धावा करत असता तेव्हा तुम्हाला चाहत्यांच्या समर्थनाची आवश्यकता असते,” असे विराट चाहत्यांची प्रशंसा करताना म्हणाला.
काय सांगता! एकट्या इंग्लंड संघाने केल्यात तब्बल ५ लाख धावा…
वाचा👉https://t.co/kYt0bRdmp0👈#म #मराठी #Cricket #SAvENG— Maha Sports (@Maha_Sports) January 25, 2020
वाढदिवस विशेष: टीम इंडियाची माॅडर्न एराची भिंत, चेतेश्वर पुजारा!
वाचा👉https://t.co/Whv74rl1Uw👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @cheteshwar1— Maha Sports (@Maha_Sports) January 25, 2020