---Advertisement---

INDvsAUS: विराटला रोखण्यासाठी करावे लागणार ‘हे’ काम; ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाचा खास प्लॅन

On: मंगळवार, डिसेंबर 15, 2020 3:33 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने आपल्या फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांना आस्मान दाखवले आहे. त्यामुळे विरोधी संघ त्याचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या योजना बनवत असतात. ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनीही विराटचा सामना करण्यासाठी विशेष रणनिती आखली आहे. १७ डिसेंबरपासून ऍडलेडच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ पहिला कसोटी सामना खेळणार आहे. विराट चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील केवळ पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर पालकत्व रजेमुळे तो मायदेशात परतणार आहे.

अशी आहे विशेष रणनिती
विराटविषयी बोलताना लँगर म्हणाले की, “विराट महान खेळाडू आहे. सोबतच तो शानदार कर्णधारही आहे. त्यामुळे त्याला सामोरे जाण्यासाठी आम्हाला विशेष रणनिती आखावी लागणार. कारण तो त्याच्या फलंदाजीने सामन्याचा कायापालट करू शकतो. म्हणून विराटला अधिक धावा करण्यापासून रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू.”

पुढे बोलताना लँगर म्हणाले की, “ऑस्ट्रेलिया कसोटी संघातील खेळाडूंना त्यांच्या तंत्रावर लक्ष द्यावे लागणार आहे. तसेच विराटशी भिडण्याऐवजी त्याला लवकर बाद करण्याच्या मार्गाचा शोध घ्यावा लागेल. याचा अर्थ असा नाही की, आम्ही त्याला उकसवण्याचा प्रयत्न करु आणि त्याचा फायदा घेत त्याची विकेट घेऊ. आम्हाला आमच्या कौशल्यावर पूर्ण विश्वास आहे. विराटच्या भावनांशी खेळणे, असे क्षुल्लक काम आम्ही चुकूनही नाही करणार.”

भारतापेक्षा ऑस्ट्रेलियाला गुलाबी चेंडू सामन्याचा जास्त अनुभव
महत्त्वाचे म्हणजे, ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना हा भारतीय संघाचा विदेशातील पहिला गुलाबी चेंडू सामना असेल. यापूर्वी भारताने केवळ एकदा गुलाबी चेंडूने सामना खेळला आहे. तोही घरच्या मैदानावर. याउलट ऑस्ट्रेलिया संघाला गुलाबी चेंडू सामन्याचा बराच अनुभव आहे. अशात पहिल्या कसोटी सामन्यात कोणता संघ बाजी मारेल?, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या-

“विराटला उकसवू नका”; ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूने दिला सहकाऱ्यांना इशारा

‘तो तर भारतीय संघाचा व्हीव्हीएस लक्ष्मण’, सराव सामन्यात शतक ठोकणाऱ्या खेळाडूबाबत माजी भारतीय फिरकीपटूचे वक्तव्य

भन्नाटच! ख्रिस लिनचा षटकार पाहून गोलंदाजही अवाक, दिली अशी प्रतिक्रिया; पाहा Video

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---