---Advertisement---

पुढील वर्षी एप्रिल-मे मध्ये आयपीएलचे आयोजन? सौरव गांगुलीने दिली माहिती

On: गुरूवार, नोव्हेंबर 5, 2020 12:51 PM
---Advertisement---

कोरोना व्हायरस या साथीच्या आजाराच्या प्रादुर्भावामुळे बरेच दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले गेले नव्हते. याचा फटका इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेलादेखील बसला. दरवर्षी या स्पर्धेची सुरुवात मार्च महिन्यात होते.मात्र, यावर्षी ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये सुरु झाली. येत्या काही दिवसात 13 व्या आयपीएल हंगामाचे अखेरचे सामने खेळले जातील. यातच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएलच्या पुढील हंगामाबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

एप्रिल ते मे महिन्यात आयपीएल होण्याची शक्यता
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एप्रिल-मे महिन्यात आयपीएलचा पुढील हंगाम भारतात होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तथापि, त्याआधी होणाऱ्या आयपीएलच्या लिलावाबद्दल ते काहीही बोलले नाही. त्यांना विश्वास आहे की तोपर्यंत कोरोना विषाणूमुळे आलेल्या परिस्थितीतून आपण बाहेर पडू आणि आयपीएल स्पर्धेचे आयोजन शक्य होईल.

भारतात आयोजन होऊ शकेल शक्य
हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सौरव गांगुली म्हणाले की “कदाचित तोपर्यंत(एप्रिल-मे २०२१) कोरोनाची लस भारतात येईल आणि आयपीएलचे आयोजन शक्य होऊ शकेल.”

पुढील वर्षापासून देशांतर्गत क्रिकेट सामन्यांना सुरुवात होईल असेही गांगुली म्हणाले

सूर्यकुमार आहे चांगला खेळाडू
आयपीएलमधील भारतीय युवा खेळाडूंच्या कामगिरीने सौरव गांगुली प्रभावित झाले आहे. सूर्यकुमार यादवविषयी बोलताना सौरव गांगुली म्हणाले की, “या हंगामात सूर्यकुमारने मुंबई इंडियन्ससाठी कठीण परिस्थितीत केलेल्या फटकेबाजीमुळे प्रभावित झालो आहे. परंतु, ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या मालिकेसाठी त्याला संघात स्थान मिळालेले नाही. तो एक चांगला खेळाडू आहे.”

ऑस्ट्रेलियात ट्रॅक रेकॉर्ड पाहून खेळावे
ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत सौरव गांगुली म्हणाले की, भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर स्वत: चा ट्रॅक रेकॉर्ड पाहून खेळले पाहिजे. मागच्या वेळी ऍडिलेडमध्ये भारतीय संघाने कसोटी सामना जिंकला होता. तो मालिकेचा पहिलाच कसोटी सामना होता.”

सन 2003 मध्ये जिंकला होता कसोटी सामना
त्याशिवाय सौरव गांगुली यांनी त्यांच्या खेळाच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, “2003 मध्ये आम्हीही तिथे कसोटी सामना जिंकला होता.”

कुटुंबियांना सोबत नेऊ शकतात खेळाडू
ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर बायो बबलमध्ये खेळाडूंच्या कुटूंबाला सोबत नेण्याच्या प्रश्नावर सौरव गांगुली म्हणाले की, “हो, खेळाडू कुटुंबासमवेत जाऊ शकतात. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आमच्या मागणीचे समर्थन केले आहे.”

बांगलादेशविरुद्ध डे-नाईट कसोटी सामन्यात भारतीय संघाने मिळवला होता विजय
गुलाबी चेंडूने भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध कोलकाता येथे दिवस रात्र कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे.

गुलाबी चेंडूने ऑस्ट्रेलिया येथे खेळल्या जाणाऱ्या कसोटीबाबत गांगुली यांनी भाष्य केले. ते म्हणाले की “भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्येही चांगली कामगिरी करेल.

महत्त्वाच्या बातम्या –

“रोहितच्या दुखापतीचा फायदा घेऊ”, क्वालिफायर सामन्याआधी दिल्लीच्या दिग्गजाची चेतावणी

मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी रोहित शर्मा सोडणार का सलामीची जागा?

रोहितची पुन्हा तंदुरुस्ती चाचणी घेण्यात गैर नाही”, माजी दिग्गजाचे रोखठोक मत

 

ट्रेंडिंग लेख –

‘बर्थडे बॉय’ विराट कोहलीबद्दल माहित नसलेल्या १५ गोष्टी!

टेकडीचा हिमालय होताना!

हॅप्पी बर्थडे विराट …!!!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---