मंगळवारी भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा व फलंदाज सुरेश रैना यांनी इंस्टाग्रामवर लाईव्ह सेशनद्वारे संवाद साधला. यावेळी दोनही खेळाडूंनी एकमेकांच्या फिटनेस, तांत्रिक बाबी व जुन्या किस्स्यांबद्दल चर्चा केली.
या सेशनच्या शेवटच्या भागात या दोन खेळाडूंनी मिळून सीएसके व मुंबई इंडियन्सचा मिळून एक छान संघ तयार केला. यात मुंबईच्या ५ तर सीएसकेच्या ६ खेळाडूंचा समावेश केला.
असे करताना रोहितने व रैनाने स्व:तचा मात्र यात समावेश केला नाही. रोहित या संघाचा सहाय्यक प्रशिक्षक तर सुरेश रैना क्षेत्ररक्षण प्रशिक्षक झाला होता. त्यांनी एमएस धोनीला कर्णधार तर मेथ्थ्यु हेडन व सचिन तेंडुलकरला सलामीवीर केले होते.
असे करताना रोहित व सुरेश रैना दोघेही यात लसिथ मलिंगाचा समावेश करायला विसरले. परंतु याबद्दल आज रोहितने माफी मागत मलिंगाचे नाव समावेश करायला हवा होता, असे ट्विट केले.
याबद्दल मुंबई इंडियन्सच्या ट्विटरवरुन एक खास ट्विट करण्यात आले होते.
Openers ➡️ @sachin_rt & @HaydosTweets ✅
Captain ➡️ @msdhoni ✅
Fielding Coach ➡️ @ImRaina ✅
Asst. Coach ➡️ @ImRo45 ✅Who all make it to Ro's MI-CSK combined XI? Watch to find out!#OneFamily pic.twitter.com/a83K8OOqXu
— Mumbai Indians (@mipaltan) May 13, 2020
यावर रोहितने रिप्लाय करत ‘आपण खऱ्याखुऱ्या चॅम्पियनला विसरलो, साॅरी माली’ असा ट्विट केला आहे. मलिंगाला प्रेमाने माली असेही म्हटले जाते.
We missed out the real champion, Mali my bad
— Rohit Sharma (@ImRo45) May 13, 2020
हा ३६ वर्षीय खेळाडू मुंबई इंडियन्सकडून २००९ पासून १२२ सामने आयपीएलमध्ये खेळला असून त्याने १९.७९च्या सरासरीने १७० विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
कोहलीशी तुलना होणारा खेळाडू पाकिस्तानचा नवा कर्णधार
आयसीसीच्या त्या एका ट्विटने सचिनला आली ‘दादी’ची आठवण
दोन विश्वचषकात चांगली कामगिरी करुनही २०१४मध्ये माझ्या घरावर फेकले होते…