---Advertisement---

कोहलीची मागणी, इंग्लंड-ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारतातही व्हायला पाहिजे ही गोष्ट

On: बुधवार, ऑक्टोबर 23, 2019 2:21 PM
---Advertisement---

भारताचा कर्णधार विराट कोहलीने मंगळवारी(22 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर म्हटले आहे की बीसीसीआयने आता कसोटी सामन्यांसाठी 5 स्टेडियम निश्चित करायला हवेत.

भारतामध्ये एकूण 20 पेक्षा अधिक कसोटी स्टेडियम आहेत. पण अनेक ठिकाणी कसोटी सामने बघण्यासाठी स्टेडियममध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या कमी असते. नुकतेच रांचीमध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यानही हेच चित्र पहायला मिळाले. त्यामुळे यावर मागील काही दिवस चर्चा सुरु होती.

त्यामुळे याबद्दल विराटला तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने उत्तर देताना म्हटले आहे की ‘हे पहा आपण बऱ्याच काळापासून ही चर्चा करत आहोत. माझ्या मते आपण कसोटी सामन्यांसाठी 5 स्थाने निश्चित करायला हवीत.’

‘जर तूम्हाला कसोटी क्रिकेटला रोमांचकारी आणि जिंवत ठेवायचे असेल, तर त्याला जिथे लोक येतील किंवा येणार नाही अशा अनेक ठिकाणी पसरले जाऊ शकत नाही.’

‘राज्य संघटना, रोटेशन आणि बाकी सर्व गोष्टी मला देखील मान्य आहेत. पण त्या गोष्टी वनडे आणि टी20 साठी ठिक आहेत. पण कसोटी क्रिकेटच्या दृष्टीने पहायचे झाले तर भारतात कसोटी खेळण्यासाठी येणाऱ्या देशांना हे माहित पाहिजे की आपण या 5 स्टेडियमवर खेळणार आहे. अशी खेळपट्टी अपेक्षित असणार आहे आणि अशाप्रकारचे लोक सामना पहाण्यासाठी येणार आहेत.’

‘हे एक आव्हान असते. आम्ही मायदेशाबाहेर गेलो की आम्हाला माहित असते आम्हाला या चार स्टेडीयमवर खेळायचे आहे. त्या खेळपट्टी कशा असणार आहेत. ते स्टेडीयम प्रेक्षकांनी भरलेले असणार आहे आणि प्रेक्षक संघाला प्रोत्साहन देणार आहेत.’

काही वर्षांपूर्वी भारतीय संघ दिल्ली, मुंबई, कोलकता, चेन्नई, बंगळुरु आणि कानपूर या ठिकाणी नियमित कसोटी सामने खेळत होता. पण नंतर बीसीसीआयने छोट्या शहरातील प्रेक्षकांनाही सामने पाहण्याची संधी मिळावी म्हणून अनेक स्टेडीयमवर कसोटी सामन्यांचे आयोजन करण्यास सुरुवात केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---