---Advertisement---

कसोटी मालिकेपूर्वी विराट कोहलीने केली पृथ्वी शॉची प्रशंसा; म्हणाला…

On: बुधवार, फेब्रुवारी 19, 2020 4:26 PM
---Advertisement---

21 फेब्रुवारीपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) बुधवारी (19 फेब्रुवारी) युवा फलंदाज पृथ्वी शॉची (Prithvi Shaw) प्रशंसा केली आहे.

यावेळी विराट म्हणाला की, शॉने आपला नैसर्गिक खेळ खेळावा अशी भारतीय संघाची इच्छा आहे.

“शॉ हा प्रतिभावान खेळाडू आहे. त्याची स्वत:ची खेळण्याची एक शैली आहे. त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की, तो ज्याप्रकारे खेळतो तसेच त्याने नेहमी खेळावे.” असे कसोटी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत विराट म्हणाला.

“मला असे वाटते की, ज्याप्रकारे मयंक अगरवाल (Mayank Agarwal) ऑस्ट्रेलियामध्ये चांगल्या मन: स्थितीने खेळला होता त्याचप्रकारे आता शॉदेखील न्यूझीलंडमध्ये खेळेल अशी आशा आहे. तसेच मयंकही आपल्या मागील कामगिरीची पुनरावृत्ती करू शकेल,” असेही विराट म्हणाला.

जर शॉला पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली तर हा त्याचा परदेशातील पहिलाच कसोटी सामना असेल.

“मला असे वाटते की, सध्या शॉमध्ये अनुभवाची कमतरता आहे. मी मयंकला अनुभवहीन म्हणणार नाही. कारण, त्याने मागील वर्षी खूप धावा केल्या होत्या. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये त्याचा खेळ कसा आहे, हे आम्हाला माहिती आहे,” असे विराट मयंकबद्दल बोलताना म्हणाला.

शॉने आतापर्यंत 2 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये 1 शतक आणि 1 अर्धशतकांच्या मदतीने 237  धावा केल्या आहेत. त्याने न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत 20, 24 आणि 40 धावांची खेळी केली होती.

9 कसोटी सामने खेळणाऱ्या अगरवालसोबत शॉ या कसोटी मालिकेत सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळू शकते.

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिला कसोटी सामना 21 फेब्रुवारीपासून बेसिन रिझर्व, वेलिंग्टन (Wellington) येथे खेळण्यात येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---