---Advertisement---

‘भारतीय संघ भित्रेपणाने खेळला, असे वाटले’, टी२० विश्वचषकातील कामगिरीबाबत रवी शास्त्रींचे मोठे भाष्य

On: शनिवार, जानेवारी 1, 2022 7:03 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघासाठी 2021 वर्ष संमिश्र ठरले. भारताने काही ऐतिहासिक विजय मिळवले, तर भारताच्या हातून दोन आयसीसी स्पर्धांची विजेतीपदे निसटली. भारताने कसोटी अंजिक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव स्विकारला, तसेच टी20 विश्वचषक स्पर्धेत तर भारताला साखळी फेरीतूनच भारतीय संघाला बाहेर पडावे लागले. आता याबद्दल भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

टी20 विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना पराभूत झाला आणि न्यूझीलंड विरुद्ध देखील पराभूत झाल्याने भारतासाठी स्पर्धेतील आव्हान कठीण झाले होते. या स्पर्धेतील भारताच्या कामगिरीबद्दल रवी शास्त्री म्हणाले, भारतीय संघ ही स्पर्धा भित्रेपणाने खेळत होता, हे त्यांच्या खेळावरून ते स्पष्टपणे दिसत होते.

“त्या सामन्यात पाकिस्तानने शानदार प्रदर्शन केले. न्यूझीलंडविरुद्ध आम्ही खूप दबावात होतो, सामन्यादरम्यान आमच्या खेळावर हे स्पष्टपणे दिसून आले. जोपर्यंत तुम्ही लढाल तोपर्यंत हरायला हरकत नाही, पण घाबरलो, तर जास्त त्रास होतो. त्यामुळे अशा स्पर्धेत तुम्ही खूप लवकर हरलात, तर तुम्ही अडचणीत येता.”

विशेष म्हणजे रवी शास्त्री या स्पर्धेदरम्यान भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. या स्पर्धेनंतर त्यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. त्यांच्याऐवजी राहुल द्रविडची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

माजी प्रशिक्षक पुढे म्हणाले की, या प्रकारच्या स्पर्धेमध्ये चुकांना जागा नसते. ते म्हणाला की 2019 च्या विश्वचषकात वापरलेले स्वरुप यापुढेही वापरले पाहिजे, जिथे प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध खेळतो. भारतीय संघ 2019  विश्वचषकामध्ये गट फेरीत अव्वल ठरला होता, पण उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

रोहित-विराट वादाविषयी निवडसमिती म्हणातायेत, “ते दोघे…”

मोहम्मद कैफ केएल राहुलबाबत म्हणाला, ‘लग्नाच्या पार्टीचीही ऑर्डर घेतो’; वाचा संपूर्ण प्रकरण

विराट-अनुष्काने टीम इंडियासह नववर्षाचे केले स्वागत, फोटो होतायेत व्हायरल

व्हिडिओ पाहा – क्रिकेटमधील डक अन् त्याचे प्रकार | 

क्रिकेटमधील डक अन् त्याचे प्रकार | Explanation Of Duck In Cricket And Its Type

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---