---Advertisement---

INDvsAUS | निर्णायक सामन्यात पाऊस करणार खोळंबा! हवामान खात्याने वर्तवलाय ‘असा’ अंदाज

On: रविवार, सप्टेंबर 25, 2022 1:22 PM
Team india
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना रविवारी (25 सप्टेंबर) हैदराबादमध्ये खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीवर आहेत. तत्पूर्वी नाहपूरमध्ये खेळला गेलेल्या दुसऱ्या सामन्यात पावसामने बाधा आणली होती. चला तर जाणून घेऊया तिसऱ्या सामन्यात अशाच प्रकारे पाऊस खोळंबा करणार की, सामना व्यवस्थित पार पडणार. 

हवामान अंदाज –
भारतीय वेळेनुसार ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा टी-20 सामना सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. हैदराबादमध्ये सायंकाळच्या वेळी अंदाजे 24 ते 25 डिग्री सेलसियस तापमान सांगितले गेले आहे. हवेतील आद्रता अंदाजे 80 टक्के असेल आणि मैदानात दव देखील असू शकते. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास याठिकाणी पाऊस येण्याचा शक्यता हवामाण खात्याने वर्तवली आहे. पावसाची शक्यता असल्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णदार प्रथम गोलंदाजीचाच निर्णय घेईल, अशी शक्यता आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात पावसामुळे प्रत्येक संघाला 8-8 षटके खेळण्याची संधी मिळाली. भारताने हा सामना 6 विकेट्सने जिंकला होता.

खेळपट्टीची माहिती –
खेळपट्टीचा विचार केला तर राजीव गांधी स्टेडियममध्ये नेहमीच फलंदाजांना मदत मिळाल्याचे पाहिले गेले आहे. याठिकाणी आतापर्यंत सहा कसोटी, सहा एकदिवसय आणि एक टी-20 सामना खेळला गेला आहे. भारतीय संघाने याठिकाणी शेवटचा सामना 2019 मध्ये खेळळा होता. वेस्ट इंडीजविरुद्धच्या या टी-20 सामन्यात विराटने 94 धावांची वादळी खेळी केली होती. भारताने वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी 209 धावांचे लक्ष्य ठेवले होते. यापूर्वीची आकडेवारी पाहता प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला याठिकाणी विजय मिळवण्यासाठी कमीत कमी 180 धावांची गरज असेल.

यातून निवडली जाणार प्लेइंग इळेव्हन – 
ऑस्ट्रेलिया: एरॉन फिंच (कर्णधार), सीन एबॉट, एश्टन एगर, पॅट कमिंस, टिम डेविड, नाथन एलिस, कैमरन ग्रीन, जोश हेजलवुड, जोश इंगलिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डेनियल सॅम्स, स्टीव स्मिथ, मॅथ्यू वेड, एडम जंपा.

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

तिसऱ्या टी20साठी रिषभ पंतचा पत्ता कट? जाणून घ्या कारण आणि भारताची संभावित प्लेईंग 11
सर्वप्रथम कोणी केले मंकडीग? नावातच दडलयं रहस्य, आयसीसीचा नियमही घ्या जाणून
थोडक्यात वाचला हॅरी ब्रुक! हेलमेटच्या ग्रीलमध्ये अडकला चेंडू, पाक गोलंदाजाची रिएक्शन व्हायरल  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---