विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघांमध्ये रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ कसून सराव करण्यात व्यस्त आहे. तर न्यूझीलंड संघ इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. अशातच या सामन्यापूर्वी एक वाईट बातमी समोर येत आहे. साउथम्प्टनमध्ये होणाऱ्या या सामन्यात पावसाचे आगमन होऊ शकते.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना साउथम्प्टनमध्येच पार पडणार आहे. एक्यूवेदर वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, साउथम्प्टनमध्ये १९ आणि २० जून रोजी पाऊस असेल. याचाच परिणाम खेळावर दिसून येऊ शकतो. १९ जून रोजी संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण असेल. तसेच सकाळी ढगाळ वातावरण झाल्यानंतर दिड तास पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु या स्टेडियमचे ड्रेनेज सिस्टम उत्तम आहे. तरीदेखील चाहत्यांना या गोष्टीचे नक्कीच वाईट वाटेल. आयसीसीने या गोष्टीचा पूर्वानुमान लावत १ दिवस राखीव ठेवला आहे.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान पावसाचे आगमन झाले; तर हे भारतीय संघासाठी देखील वाईट असेल. त्यादिवशी ढगाळ वातावरण असणार आहे असे म्हटले जात आहे. याचाच अर्थ असा की, ढगाळ वातावरणात चेंडू जास्त स्विंग होतो. न्यूझीलंड संघात ट्रेंट बोल्ट, टीम साउथी यांसारखे घातक गोलंदाज आहेत. न्यूझीलंडमध्येही त्यांना अशाच परिस्थितीमध्ये खेळण्याची सवय आहे. तसेच भारतीय संघातील खेळाडू विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा यांना स्विंग गोलंदाजी खेळताना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे भारतीय संघाला सांभाळून फलंदाजी करावी लागणार आहे.
असा आहे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे , हनुमा विहारी, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल, रिद्धीमान साहा.
राखीव खेळाडू : अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जन नागवासवाला
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी क्रमवारीत भारतीय अष्टपैलूंचा दबदबा; जडेजाची दुसऱ्या स्थानी झेप, तर अश्विन ‘या’ क्रमांकावर कायम
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी विंडिज संघाची घोषणा, ‘या’ दिग्गजाचे पुनरागमन
‘असं कोणीही नसेल ज्याला पाकिस्तानकडून खेळायचे नाही,’ पाकिस्तानी मूळ असलेल्या ताहिरचे भाष्य