---Advertisement---

मोठी बातमी! टी20 विश्वचषक 2007च्या विजयावर बनणार वेब सीरिज, दिसणार 15 भारतीय खेळाडू

On: शुक्रवार, नोव्हेंबर 18, 2022 4:46 PM
2007 T20 Worldcup Team India
---Advertisement---

भारताने टी20 विश्वचषक  (T20 World Cup)पहिल्यांदा 2007मध्ये एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली जिंकला. या स्पर्धेत भारताच्या संघात 15 जण होते. जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 धावांनी पराभूत केले. हा ऐतिहासिक विजय आता चाहत्यांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांच्यानुसार 2007च्या टी20 विश्वचषक विजयावर वेब सीरिज बनवली जाणार आहे, ज्यामध्ये 15 भारतीय खेळाडूंचा समावेश असणार आहे.

तरण आदर्श (Taran Adarsh) यांनी ट्वीट करत याची माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले, ‘2007 टी20 विश्वचषकावर आता वेब सीरीज बनणार आहे. ही वेब सीरीज अनेक भाषांमध्ये रिलीज होणार असून त्याचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. तसेच 15 भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश असलेली ही वेब सीरिज 2023मध्ये रिलीज होणार आहे. सध्यातरी या सीरिजचा काही भाग शूट झाला आहे.’

‘युकेचे निर्माते गौरव बहिर्वानी, दिग्दर्शक आनंद कुमार आणि लेखक सौरव पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ऐतिहासिक क्षणाचे प्रदर्शन होणार आहे,’ असेही आदर्श यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले.

बॉलीवूड आणि क्रिकेटचे नाते अत्यंत जुने आहे. बॉलीवूडने क्रिकेटवर अनेक सिनेमे काढले आहेत. ज्यामध्ये मिताली राज हिच्यावर ‘शाबास मिथु’, मोहम्मद अझरूद्दीन यांच्यावर ‘अझहर’, सचिन तेंडुलकर याच्यावर ‘सचिन – ए बिलियन ड्रीम्स’ आणि एमएस धोनी याच्यावर ‘एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी’ यांचा समावेश आहे. तसेच नुकतेच 1983च्या विश्वचषकावर 83 नावाचा सिनेमा बनवला गेला. ज्याला यश मिळाले.

आता चाहत्यांना 2007च्या टी20 विश्वचषकाचा विजय मोठ्या पडद्यावर दिसणार असून 2023मध्ये त्याचा आंनद घेता येईल. 2007 मध्ये भारताने 7 सामने खेळले. ज्यामधील स्कॉटलंड विरुद्धचा पहिला सामना रद्द झाला, दुसऱ्या सामन्याचा निकाल बॉल-आऊटमध्ये लागला (पाकिस्तान) आणि तिसरा सामना न्यूझीलंडने 10 धावांनी जिंकला. त्यानंतर भारताने सलग चार सामने जिंकले. ज्यामध्ये उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीच्या सामन्यांचा समावेश होता. Web Series on T20 World Cup, set to release in 2023

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: टी20 विश्वचषकात तिसऱ्या स्थानासाठी सामना? विल्यमसन उत्तरला, ‘हार्दिक तुला काय…’
‘मी सांगतो ना तो पुढच्या 10 वर्षात टी20 गाजवेल’, भारताच्या माजी खेळाडूची मोठी भविष्यवाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---