टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिराबाई चानूने रौप्य पदक जिंकून इतिहास घडवला आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती दुसरी भारतीय महिला वेटलिफ्टर आहे. तिने या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकून दिले आहे. स्टार वेटलिफ्टर मिराबाई रविवारी (८ ऑगस्ट) आपला आज २५ वा वाढदिवस साजरा करत आहे. ८ ऑगस्ट, १९९४ मध्ये इम्फालमध्ये तिचा जन्म झाला होता. परंतु मिराबाईसाठी यावेळेचा वाढदिवस खूप खास आणि संस्मरणीय असणार आहे. तिच्या या वाढदिवशी आपण काही खास गोष्टी जाणून घेऊया…
आपल्या बॅगेत ठेवते देशाची माती
मिराबाई चानूबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे की, ती आपल्या बॅगेत इतर वस्तूंआधी नेहमीच देशाची माती ठेवते. इतकेच नव्हे, तर परदेशात सुद्धा ती फक्त गावाकडील भात खात असते. त्याचबरोबर मिराबासाठी ऑलिम्पिकमध्ये यश मिळवण्याचा प्रवास सोपा नव्हता. २००६ मध्ये वेटलिफ्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली आहे. ती प्रशिक्षण घेत असलेले केंद्र तिच्या घरापासून २० किमी अंतरावर होते.
https://www.instagram.com/p/CR6kDvSssjE/?utm_source=ig_web_copy_link
मिराबाई प्रशिक्षण घेण्यासाठी ट्रक चालकांकडून लिफ्ट घेऊन जात असायची. त्या ट्रक ड्रायव्हर्सला मिराबाईमधील जिद्द लक्षात आल्यानंतर ते ड्रायव्हर्स तिच्याकडून पैसे घेत नसायचे. टोकियो ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर मिराबाईने ट्रक चालकांना मिठाई देऊन त्यांचे आभारही मानले.
https://www.instagram.com/p/CSBlRStMzXM/?utm_source=ig_web_copy_link
मिराबाई चानूला ६ भावंडे आहेत. अशा परिस्थितीत, कमी पगारात प्रत्येकाचे पालनपोषण करण्याबरोबरच मिराबाईचे स्वप्न पूर्ण करणे तिच्या वडिलांसाठी सोपे नव्हते. परंतु असे असूनही, त्यांनी मिराबाईचे स्वप्न साकार करण्यासाठी आकाश पाताळ एक केले.
https://www.instagram.com/p/CRWoSd5Mhxw/?utm_source=ig_web_copy_link
त्याचबरोबर वडिलांच्या कष्टाची जाण ठेऊन मिराबाईने कठोर परिश्रम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्याचे यश म्हणजे टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिने मिळवलेले रौप्य पदक हे एक आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-नीरज तुसी ग्रेट हो! भारताच्या भालाफेकपटूने मिल्खा सिंग यांना ‘गोल्ड’ मेडल केले समर्पित
-राजीव गांधींचे नाव हटवताच गोल्ड आले; नीरज चोप्रावरील ‘त्या’ ट्वीटने पेटला नवा वाद





