भारतीय संघाचा (Team India) अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) आणि एका क्रीडा पत्रकार यांच्यातील वाद काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता. साहाने खुलासा केला होता की, पत्रकाराकडून त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्यावेळी त्या पत्रकाराचे नाव साहाने सांगितले नव्हते. पण, नंतर साहाने बीसीसीआयकडे त्या पत्रकाराचे नाव उघड केले होते. आता हा पत्रकार स्वतः समोर आला आहे. या पत्रकाराचे नाव आहे, सुप्रसिद्ध बोरिया मजूमदार (Boria Mujumdar).
त्यांच्या म्हणण्यानुसार साहाने सादर केलेल्या वॉट्सअप चॅटमध्ये त्याने छेडछाड केली आहे आणि त्याने चर्चेचा खूप थोडा भाग समोर आणला आहे. त्यांनी शनिवारी (५ मार्च) झालेल्या प्रकरणाची माहिती दिली आहे.
सोशल मीडिया खात्यावरून एक व्हिडिओ शेअर करत मजूमदार यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. वृद्धिमान साहाने माझ्या वॉट्सअप चॅटसोबत छेडछाड केली आहे, ज्यामुळे माझी प्रतिष्ठा आणि विश्वसनीयतेचे नुकसान झाले आहे. मी बीसीसीआयकडे निष्पक्ष सुनावणीसाठी मागणी करत आहे. माझे वकील साहाला मानहानीसाठी नोटीस पाठवत आहेत. खऱ्याचा विजय होऊ द्या.”
https://twitter.com/BoriaMajumdar/status/1500155131458818051
मजूमदारने याविषयी स्पष्टीकरण देण्यापूर्वी साहाने शनिवारी (५ मार्च) बीसीसीआयपुढे या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला होता. याविषयी बोलताना साहा म्हणालेला की, “मी समितीला ते सर्व सांगितले आहे, जे मला माहिती आहे. मी त्यांना सर्व माहिती दिली आहेे. मी आत्ता तुम्हाला जास्त काही सांगू शकत नाही. बीसीसीआयने मला या बैठकीविषयी बाहेर काही सांगण्यास मनाई केली आहे, कारण ते तुमच्या सर्वांच्या प्रश्नाची उत्तरे देतील.”
दरम्यान, श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत संधी न मिळाल्यानंतर साहाने या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला होता. १९ फेब्रुवारीला या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली केली होती.
त्यानंतर मूजूमदार यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत ते म्हणाले आहे की, साहाने त्या दोन दिवसात झालेल्या चॅटिंगचा खूप थोडा भाग जगासमोर आणला आहे आणि एक वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी व्हिडिओत असेही सांगितले की, ही चॅटिंग १९ फेब्रुवारीची नाहीय, जेव्हा त्याला भारतीय संघातून वगळले गेले. ही चॅटिंग १० आणि १३ फेब्रुवारीची आहे, ज्यामध्ये ते स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर आयपीएल २०२२ लिलावासाठी रिल्स बनवू इच्छित होते. याच संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली होती, पण मुलाखतीपूर्वी साहाने फोन उचलला नव्हता.
महत्वाच्या बातम्या –
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेन वॉर्नचे ‘ते’ तीन सामने, ज्यांनी त्याला बनवले ‘फिरकीचा जादूगार’
आयएसएल: माजी विजेत्या बंगलोर एफसीचा विजयी निरोप, सुनील छेत्रीचा निर्णायक गोल
जडेजा-अश्विनच्या भविष्याबाबत भारतीय दिग्गजाचे मोठे वक्तव्य; म्हणाला, “आता या दोघांना…”