भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीचे चाहते जगभर पहायला मिळतात. तसेच ते अनोखे उपक्रमही करताना दिसून येतात. अशाच एका शंभू बोस या धोनीच्या चाहत्याचे बंगालमधील अलीपुरद्वार जिल्ह्यात ‘एमएस धोनी हॉटेल’ नावाने हॉटेल आहे आणि शंभू या हॉटेलमध्ये येणाऱ्या धोनी चाहत्यांना मोफत जेवन देतो.
या हॉटेलबद्दल आयएएनएसशी बोलताना 32 वर्षीय शंभूने सांगितले की ‘या दूर्गा पूजेला, आम्ही दोन वर्षे पूर्ण करु. इथे सर्वजणांना हे ठिकाण माहित आहे आणि इथे लोक खायला येतात. आजूबाजूला कोणालाही धोनी हॉटेलबद्दल विचारा, तूम्ही इथे न चूकता याल.’
तसेच धोनीचे कौतुक करताना शंभू म्हणाला, ‘त्याच्यासारखे कोणी नाही. मला लहानपणापासून तो आवडतो. तो जसा आहे आणि क्रिकेट जसे क्रिकेट खेळतो, त्यावरुनच कळते की तो महान कसा बनला आहे. तो माझ्यासाठी प्रेरणा आहे.’
या हॉटेलमध्ये मुख्यत: बंगाली पदार्थ मिळतात. तसेच या हॉटेलमध्ये प्रत्येक ठिकाणी धोनीचे पोस्टर लावलेले आहेत.
शंभू पुढे म्हणाला, ‘माझ्या घरीही असेच आहे. मी त्याच्याकडून खूप काही शिकलो आहे. माझी त्याला भेटण्याची इच्छा आहे. पण माझ्याकडे स्टेडियममध्ये जाऊन सामने बघण्यासाठी एवढे पैसे नाही.’
‘मला माहित आहे माझे स्वप्न पूर्ण होणार नाही. पण जर मी त्याला कधी भेटलो तर मी त्याला माझ्या हॉटेलमध्ये येण्याची विनंती करेल. मला माहित आहे त्याला माच्छी-भात आवडतो.’
याबरोबरच शंभूने यावर्षी होत असलेल्या विश्वचषकात भारतीय संघ 2011 विश्वचषकाची पुनरावृत्ती करेल अशी आशा व्यक्त केली आहे.
तो म्हणाला, ‘तेव्हा(2011) मी चहाचे दुकान चालवत होतो. त्याला काही नाव नव्हते पण माझ्याकडे धोनीचे छोटे पोस्टर होते. मला त्याचे लांब केस आवडायचे. मला आठवते मी 2011 च्या विश्वचषकाचा अंतिम सामना माझ्या चहाच्या दुकानाशेजारी असलेल्या टीव्हीवर माझ्या मित्रांबरोबर पाहिला होता. मी कधीही ती रात्र विसरणार नाही, मी तेव्हा खूप रडलो होतो.’
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–…म्हणून रवी शास्त्रींनी ड्रेसिंग रुमच्या बाल्कनीमधून दाखवली धोनीची जर्सी
–इंग्लंडच्या जो रुटने केली विश्वचषकातील तब्बल २३ वर्षांपूर्वीच्या मोठ्या पराक्रमाची बरोबरी