---Advertisement---

दमदार शतकासह ‘या’ कॅरेबियन फलंदाजाने विराटला सोडले मागे, फिंचची केली बरोबरी

On: गुरूवार, मार्च 11, 2021 2:55 PM
---Advertisement---

वेस्ट इंडीज आणि श्रीलंका यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना यजमान वेस्ट इंडीजने मालिकेत आघाडी घेतली आहे. ऍटिंग्वा येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात वेस्ट इंडीजने ८ गड्यांनी विजय मिळवला. वेस्ट इंडीजच्या विजयाचा शिल्पकार यष्टीरक्षक सलामीवीर शाई होप ठरला. त्याने आक्रमक शतक झळकावत संघाला विजयी केले. या शतकासह होपने भारतीय कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले.

होपने केली फिंचची बरोबरी
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात होपने आपल्या वनडे कारकिर्दीतील १० वे शतक पूर्ण केले. त्याचबरोबर, २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये तो संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी आला आहे. त्याने या काळात सहावे शतक ठोकताना ऑस्ट्रेलियन कर्णधार ऍरॉन फिंचची बरोबरी केली.
होपने या शतकासह भारताचा कर्णधार विराट कोहली व पॉल स्टर्लिंग यांच्या प्रत्येकी ५ शतकांना मागे सोडले. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा सर्वाधिक ८ शतकांसह यादीमध्ये अव्वलस्थानी आहे.

वेस्ट इंडीजने केला श्रीलंकेचा पराभव
ऍटिंग्वा येथे खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. दनुष्का गुणतिलका व कर्णधार दिमुथ करूणारत्ने यांनी शतकी सलामी देत श्रीलंकेला चांगली सुरुवात दिली. मात्र, मधली फळी अपयशी ठरली. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या असेन बंदारा याने अर्धशतक झळकावत श्रीलंकेला २३२ धावांपर्यंत मजल मारून दिली. वेस्ट इंडीजकडून, जेसन होल्डर व जेसन मोहम्मद यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद केले.

प्रत्युत्तरात, शाई होप व एविन लुईस यांनी वेस्ट इंडिजला १४८ धावांची सलामी देत संघाचा विजय निश्चित केला. लुईसने ६७ तर होपने ११० धावांची खेळी केली. डॅरेन ब्राव्हो व जेसन मोहम्मद यांनी आणखी पडझड होऊ न देता संघाचा विजय साकारला. शतकी खेळी करणाऱ्या होपला सामनावीर घोषित करण्यात आले. मालिकेतील दुसरा सामना १२ मार्च रोजी खेळवला जाईल.

महत्वाच्या बातम्या:

स्वदेशी ॲप कूची क्रिकेटपटूंनाही भुरळ, अनिल कुंबळेसह अनेकांनी उघडले खाते

धर्मांतर केल्यावर माझ्या फलंदाजीमध्ये, माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफचे खळबळजनक वक्तव्य

अविश्वसनीय! श्रीलंकन खेळाडूचा किरोन पोलार्डने घेतला लाजवाब झेल, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---