---Advertisement---

कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार ‘हा’ धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू

On: शनिवार, सप्टेंबर 12, 2020 6:59 PM
---Advertisement---

मुंबई । इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 13 वा हंगाम सुरू होण्यास अजून काही दिवस शिल्लक आहेत. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी संघ याकरिता कठोर परिश्रम घेत आहेत, तसेच परदेशी खेळाडूंनीही हळूहळू त्यांच्या संघात सामील होण्यास सुरवात केली आहे. वेस्ट इंडिजमध्ये नुकत्याच पार पडलेल्या कॅरिबियन प्रीमियर लीगनंतर आता वेस्ट इंडिजचे खेळाडूही युएईकडे आयपीएलमध्ये खेळण्यासाठी रवाना होत आहेत.

कोलकाता नाईट रायडर्स संघातील महत्त्वाचा खेळाडू आंद्रे रसल देखील युएईमध्ये दाखल होणार आहे. केकेआरने आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे ही माहिती दिली आहे.

केकेआरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर आंद्रे रसेलचा फोटो शेअर केला आहे. त्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “फ्लाइट मोड … जरा अंदाज लावा, युएईला कोण पोहचणार आहे.

गेल्या काही वर्षातील आंद्रे रसेलच्या कामगिरीवर नजर टाकल्यास तो संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू ठरला आहे.  मागील वर्षीही स्पर्धेत त्याची कामगिरी चांगली होती. त्याने 56.66 च्या सरासरीने 510 धावा केल्या होत्या. या काळात त्याचा स्ट्राईक रेट 204.81 होता. त्याने चार अर्धशतके केली होती. केकेआरच्या कोचिंग स्टाफमध्ये असलेले प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्यूलम आणि डेव्हिड हसी यावर्षी त्याला वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास पाठवण्याचा विचार करीत आहेत.

कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) या हंगामातील पहिला सामना 23 सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध सामना खेळणार आहे. केकेआर आपला शेवटचा साखळी सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध 1 नोव्हेंबरला खेळेल. या स्पर्धेची सुरुवात यंदा 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि मागील हंगामातील उपविजेते चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यांच्यात सामना होईल.

कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) साठी मागील काही हंगाम चांगले ठरले नाहीत. गौतम गंभीरच्यानंतर दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील खेळणाऱ्या संघाला फारसे चांगले यश मिळालेलं नाही. गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकाताने आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन करंडक जिंकली आहेत.

कोलकाता नाईट रायडर्सचा संघ-

दिनेश कार्तिक ( कर्णधार), रिंकू सिंग, सिद्धेश लाड, प्रसिद्ध कृष्णा, शिवम मावी, कमलेश नागरकोटी, हॅरी गार्नी, संदीप वारियर, नितीश राणा, लॉकी फर्ग्युसन, शुभमन गिल, कुलदीप यादव, सुनील नरेन, आंद्रे रसेल, निखिल नाईक, टॉम बंटन, ख्रिस ग्रीन, एम. सिद्धार्थ, वरुण चक्रवर्ती, राहुल त्रिपाठी, पॅट कमिन्स, इयन मॉर्गन.

महत्त्वाच्या बातम्या-

-चेन्नई सुपर किंग्जमध्ये रैनाची जागा घेणारा हा खास ‘टेस्ट स्पेशालिस्ट बॅट्समन; शेन वॉटसनचा दावा

-प्रीती झिंटाच्या टीमच्या हाती यंदाही लागणार निराशा; दिग्गजाने केली भविष्यवाणी

-खुशखबर! प्रवीण कुमार, मुनाफ पटेल ‘या’ लीगमधून करणार क्रिकेटमध्ये पुनरागमन

ट्रेंडिंग लेख-

-या ३ कारणांमुळे आयपीएल २०२० चॅम्पियन बनणार किंग्ज इलेव्हन पंजाब संघ?

-अजूनही आयपीएल खेळत असते तर, हे ५ परदेशी खेळाडू झाले असते सुपर डुपर हिट

-मुछे हो तो नत्थूलाल जैसी अन् क्रिकेटर असावा तर लालाजींसारखा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---