क्रिकेट वेस्ट इंडिजने भारत आणि न्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी १६ जणांचा संघ जाहीर केला आहे. टी२० मालिकेतील पहिला सामना त्रिनिदाद येथील ब्रायन लारा क्रिकेट अकादमीत खेळवला जाणार आहे. २९ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान पाच सामन्यांची टी२० मालिका खेळवली जाणार आहे. त्रिनिदादनंतर दोन्ही संघ दुसऱ्या आणि तिसऱ्या टी२० सामन्यासाठी सेंट किट्स येथे जाणार आहेत. यानंतर मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळवला जाईल.
भारताविरुद्धच्या टी२० मालिकेचे वेळापत्रक:
पहिली टी२० – २९ जुलै (त्रिनिदाद)
दुसरी टी२०- ०१ ऑगस्ट (सेंट किट्स)
तिसरी टी२० – ०२ ऑगस्ट (सेंट किट्स)
चौथी टी२० – ०६ ऑगस्ट (लॉडरहिल, फ्लोरिडा)
पाचवा टी२० – ०७ ऑगस्ट (लॉडरहिल, फ्लोरिडा)
भारताविरुद्धची टी२० मालिका संपल्यानंतर कॅरेबियन खेळाडूंचा सामना घरच्या मैदानावर न्यूझीलंडशी होणार आहे. यादरम्यान दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी२० मालिका खेळवली जाणार आहे. बुधवार १० ऑगस्ट ते रविवार १४ ऑगस्ट दरम्यान किवी संघाविरुद्धचे सामने होणार आहेत. किवी संघाचे सर्व सामने जमैका येथील सबिना पार्क येथे होणार आहेत.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेचे वेळापत्रक:
पहिला टी२० – १० ऑगस्ट (सबिना पार्क, जमैका)
दुसरा टी२० – १२ ऑगस्ट (सबिना पार्क, जमैका)
तिसरा टी२० – १४ ऑगस्ट (सबिना पार्क, जमैका)
कॅरेबियन स्टार फलंदाज शिमरॉन हेटमायर आगामी मालिकेसाठी तंदुरुस्त झाला असून तो मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच वेळी, शेल्डन कॉट्रेल अजूनही दुखापतीतून सावरत आहे. याशिवाय अष्टपैलू फॅबियन ऍलन आगामी मालिकेत वैयक्तिक कारणांमुळे अनुपलब्ध राहणार आहे.
भारत व न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघ-
निकोलस पूरन (कर्णधार), रोव्हमन पॉवेल (उपकर्णधार), शामराह ब्रूक्स, डॉमिनिक ड्रेक, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रॅंडन किंग, काइल मेयर्स, ओबेद मॅककॉय, कीमो पॉल, रोमॅरियो शेफर्ड, ओडेऑन, ओबेद. डेव्हॉन थॉमस आणि हेडन वॉल्श जूनियर
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
WIvIND: टी२० मालिकेसाठी कॅरेबियन संघाची घोषणा; आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूंचे कमबॅक
वेगाचा बादशहा थांबणार! फॉर्मुला वन चॅम्पियन वेटेलची निवृत्तीची घोषणा; भारताशी होते खास नाते
‘लॉर्ड’ शार्दुल विसरतोय त्याची भारतीय संघातील भूमिका, माजी निवडकर्त्याने करून दिलीय आठवण