मागील चार टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी वेस्ट इंडिजची धर्ती चांगली राहिलेली नाही. टी20 विश्वचषक 2024 ची अंतिम फेरी गमावल्यानंतर आफ्रिकन संघाने सलग तीन टी20 आंतरराष्ट्रीय सामने गमावले आहेत. यजमान वेस्ट इंडीजने आता दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा पराभव केला आहे. तीन सामन्यांची टी20 मालिका कॅरेबियन संघाने 3-0 ने जिंकली आहे. मालिकेतील तिसरा सामना अतिशय वेगवान खेळींचा होता. मात्र कॅरेबियन संघाने दमदार खेळ दाखवला आणि शेवटच्या सामन्यासह मालिकेत आफ्रिकेचा क्लीन स्वीप केला.
टी20 मालिकेतील तिसरा सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 13 षटकांत 4 गडी गमावून 108 धावा केल्या. यानंतर पावसाने सामन्यात व्यत्यय आणला. सामना प्रत्येकी 13 षटकांचा कमी करावा लागला. डीएलएस पद्धतीमुळे वेस्ट इंडिजला 116 धावांचे लक्ष्य मिळाले. जे यजमान संघाने अवघ्या 9.2 षटकांत पूर्ण केले. वेस्ट इंडिजची पहिली विकेट 2 धावांवर पडली. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या निकोलस पूरनने झंझावाती खेळी करत सामन्याला जीवदान दिले.
निकोलस पूरनने 13 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने झटपट 35 धावा केल्या. यानंतर शाई होप आणि शिमरॉन हेटमायर यांनी सामना संपवला. शाई होपने 24 चेंडूत 42 आणि हेटमायरने 17 चेंडूत 31 धावा करत सामना लवकर संपवला. दक्षिण आफ्रिकेसाठी ट्रिस्टन स्टब्सने 15 चेंडूत 40 धावा केल्या आणि कर्णधार एडन मार्करामने 12 चेंडूत 20 धावा केल्या. पण त्याचा डाव काही कामी आला नाही. वेस्ट इंडिजने मालिकेतील पहिला सामना सात विकेट्सने, तर दुसरा सामना 30 धावांनी जिंकला. तिसऱ्या सामन्यात दोन बळी घेणारा रोमॅरियो शेफर्ड सामनावीर ठरला, तर शाई होपला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.
हेही वाचा-
हत्या प्रकरणातील आरोपी ‘शाकिब अल हसन’ची कारकीर्द संपणार का? बोर्डाकडून मोठी अपडेट
महिला, अपंग आणि कसोटी क्रिकेटमध्ये होणार मोठा बदल! ICC अध्यक्ष जय शहांची पहिली प्रतिक्रिया
जय शहा क्रिकेटमध्ये कसे आले? वयाच्या 21 व्या वर्षी कमावले नाव, पाहा रंजक प्रवास