वेस्ट इंडिजचा गोलंदाज जेडन सील्स यानं बांगलादेश विरुद्ध जारी दुसऱ्या कसोटीत एक अनोखा रेकॉर्ड आपल्या नावे केला. सील्सनं जवळपास 16 षटकं गोलंदाजी केली आणि केवळ 5 धावा दिल्या. अशाप्रकारे तो कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या 46 वर्षांत सर्वात कमी धावगती राखणारा गोलंदाज बनला आहे. त्यानं भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवचा रेकॉर्ड मोडला. या सामन्यात सील्सनं घातक गोलंदाजी करत बांगलादेशच्या 4 फलंदाजांना तंबूत पाठवलं.
उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज जेडन सील्सनं 15.5 षटकं गोलंदाजी केली, ज्यापैकी 10 षटकं मेडन राहिली. या दरम्यान त्यानं फक्त 5 धावा खर्च केल्या. त्याचा इकॉनॉमी रेट 0.30 एवढा राहिला. 1978 पासून कसोटी क्रिकेटमध्ये किमान 10 षटकं गोलंदाजी करताना हा सर्वात कमी इकॉनॉमी रेट आहे. यापूर्वी उमेश यादवनं 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 21 षटकांत 9 धावा दिल्या होत्या. उमेशचा इकॉनॉमी रेट 0.42 होता. त्याला एकूण 3 विकेट मिळाल्या होत्या आणि त्यानं 16 षटकं मेडन टाकले होते.
या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर मनिंदर सिंहचं नाव आहे, ज्यानं 1986 मध्ये इंग्लंडविरुद्ध 20.4 षटकं गोलंदाजी करताना केवळ 9 धावा दिल्या होत्या. त्यानं 12 ओव्हर मेडन टाकले होते. ग्रेग चॅपेलनं 1979 मध्ये इंग्लंडविरुद्ध 11 षटकांत 5 धावा दिल्या होत्या. यापैकी 6 षटकं मेडन होते. या लिस्टमध्ये पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लॉयन आहे, ज्यानं 2014 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 22 षटकांत केवळ 10 धावा दिल्या होत्या. त्यानं तब्बल 17 षटकं मेडन टाकली होती. त्याचा इकॉनॉमी रेट 0.45 एवढा होता.
हेही वाचा –
दुसऱ्या कसोटीपूर्वी बुमराह-कोहली सराव सामना खेळले नाहीत, कारण जाणून घ्या
IND vs AUS; दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग 11, या खेळाडूंना मिळणार संधी
जो रूटने मोडला सचिन तेंडुलकरचा आणखी एक विश्वविक्रम, आता या बाबतीत अव्वल स्थानी