---Advertisement---

इंग्लंडने वेस्ट इंडीजचा पराभव केल्यानंतर जेसन होल्डरने यासाठी भारताकडे मागितली मदत

On: गुरूवार, जुलै 30, 2020 11:47 AM
---Advertisement---

मुंबई । कोरोना व्हायरस महामारीच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट गेल्या 4 महिन्यांपासून बंद होते. त्यानंतर वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात झाली. वेस्ट इंडीजने पहिला सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेतली. मात्र, त्यानंतर इंग्लंड उर्वरित दोन्ही सामन्यात दमदार पुनरागमन करत मालिका 2-1 फरकाने जिंकली.

तिसर्‍या आणि अखेरच्या सामन्यात वेस्ट इंडीज संघाला 269 धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने भारत आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडे मदत मागितली आहे. त्यामुळे प्रत्येकाचे लक्ष वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाकडे लागले आहे.

जेसन होल्डर म्हणाला की, “गेली काही वर्षे वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डासाठी आर्थिकदृष्ट्या कठीण होते. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाला त्यांच्याच देशात हा खेळ आयोजित करणे अवघड जात आहे, त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी या वर्षाच्या अखेरीस इंग्लंडच्या संघाने वेस्ट इंडिज दौऱ्याचा विचार करावा.”

वेस्ट इंडीजच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बहुतेक सर्व देशांना माहिती आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खेळण्यापूर्वी संघातील सर्व खेळाडूंच्या पगाराच्या 50% कपात करण्यात आली होती. विशेष म्हणजे मायदेशी परतल्यानंतर सीपीएलची सुरुवात वेस्ट इंडिजमध्ये होईल, पण त्यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रक अद्याप निश्चित झालेला नाही. यावर बोलतांना होल्डर म्हणाला की, “वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड केवळ इंग्लंड आणि भारत यांचे दौरे आयोजन करून पैसा मिळवू शकेल.”

महत्त्वाच्या बातम्या – 

झाडावर बसून ‘चिल’ करणारा विराट पाहिलाय का? पाहून व्हाल चकित…

इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना मिळाली सामान जप्त करण्याची धमकी, पाक बोर्ड म्हणतंय…

जेव्हा हा दिग्गज म्हणाला होता, ‘विराट कोहली नव्हे तर अजिंक्य रहाणेला करा भारताचा कर्णधार’

ट्रेंडिंग लेख –

आयपीएल २०२० मध्ये हे ५ मोठे विक्रम मोडण्याची शक्यता…

आयपीएल २०२० – प्रत्येक संघाकडे असणारा एक परदेशी खेळाडू जो एकहाती बदलू शकतो सामन्याचा निकाल…

आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप २०२०: सर्वाधिक धावा करणारे आणि विकेट घेणारे अव्वल १० क्रिकेटपटू…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---