भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा 12 जुलैपासून सुरू होत आहे. या दौऱ्याच्या एक महिन्यापूर्वी भारताने कसोटी आणि वनडे संघाची घोषणा केली होती. त्यानंतर गुरुवारी (दि. 29 जून) भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी वेस्ट इंडिजच्या निवड समितीने 18 सदस्यांचा संघ घोषित केला आहे. खरं तर, या मालिकेची सुरुवात 12 जुलैपासून पहिल्या कसोटी सामन्याने होईल. तसेच, दुसरा सामना 20 जुलै रोजी खेळला जाईल. दोन्ही संघ यातून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामाची सुरुवात करतील. विशेष म्हणजे, कसोटी मालिका संपल्यानंतर उभय संघात 3 वनडे आणि 5 टी20 सामन्यांची मालिकाही खेळली जाईल.
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (West Indies vs India) संघातील कसोटी सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी यजमान संघ 30 तारखेपासून तयारीला सुरुवात करेल. कसोटी मालिकेची तयारी एँटिग्वाच्या कूलिज क्रिकेट मैदानावर केली जाईल. तसेच, डॉमिनिका येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी संघ 9 जुलै रोजी भरारी घेईल. संघाचा नियमित कर्णधार क्रेग ब्रेथवेट (Kraigg Brathwaite) या मालिकेतून आपल्या संघाचे नेतृत्व करताना दिसेल.
खरं तर, वेस्ट इंडिज संघ सध्या झिम्बाब्वे येथे वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचे क्वालिफायर्स सामने खेळत आहे. या संघात असे अनेक खेळाडू आहेत, जे भारताविरुद्ध कसोटी मालिकेत भाग घेऊ शकतात. मात्र, अद्याप त्यांच्याविषयी बोर्डाकडून कोणतीच माहिती समोर आली नाहीये. जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ आणि काईल मेयर्स यांची भारताविरुद्धच्या कसोटी संघात सामील होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात खेळल्या जाणाऱ्या या कसोटी मालिकेचा पहिला सामना डॉमिनिका, तर दुसरा त्रिनिदाद येथील क्वीन्सपार्क येथे खेळला जाईल. हा दुसरा कसोटी सामना दोन्ही संघांमध्ये खेळला जाणारा 100 वा सामना असेल. (west indies cricket announce 18 member squad for test camp ahead of series against team india)
वेस्ट इंडिज संघ
क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), एलिक अथानाज, जर्मेन ब्लॅकवूड, एनक्रुमाह बोनर, तेजनारायण चंद्रपॉल, रहकीम कॉर्नवॉल, जोशुआ दा सिल्वा, शॅनन गॅब्रिएल, कावेम हॉज, अकीम जॉर्डन, जैर मॅकऍलिस्टर, किर्क मॅकेन्झी, मार्क्विनो मिंडली, केमर रोच, अँडरसन फिलिप, रेमन रीफर, जेडेन सील्स, जोमेल वॅरिकन.
महत्वाच्या बातम्या-
भारतीय संघात शिखर धवनचे 9 महिन्यांनी पुनरागमन! मिळणार थेट कर्णधारपदाची जबाबदारी
वनडे विश्वचषकासाठी बीसीसीआय एका झटक्यात खर्च करणार 500 कोटी! वाचा बोर्ड नेमकं काय करणार?