पोर्ट ऑफ स्पेन। आज (14 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात तिसरा आणि वनडे मालिकेतील शेवटचा सामना पार पडणार आहे. क्विन्स पार्क ओव्हल स्टेडीयमवर होणाऱ्या सामन्यात वेस्ट इंडीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघाने 11 जणांच्या भारतीय संघात 1 बदल केला आहे. आजच्या सामन्यासाठी कुलदीप यादवऐवजी युजवेंद्र चहलला 11 जणांच्या संघात संधी मिळाली आहे. हा एकमेव बदल वगळता दुसऱ्या वनडे सामन्यात खेळलेला संघ कायम आहे.
तसेच वेस्ट इंडीजने आजच्या सामन्यासाठी दोन बदल केले आहेत. त्यांनी शेल्डन कॉट्रेल ऐवजी आज किमो पॉलला आणि ओशान थॉमस ऐवजी फॅबियन ऍलेनला 11 जणांच्या संघात संधी दिली आहे.
या वनडे मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिकाही जिंकण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल. तर वेस्ट इंडीजचा आजचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करतील.
असे आहेत 11 जणांचे संघ –
भारत – रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टिरक्षक), केदार जाधव, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, खलील अहमद.
3rd ODI. India XI: S Dhawan, R Sharma, V Kohli, R Pant, S Iyer, K Jadhav, R Jadeja, B Kumar, M Shami, Y Chahal, K Ahmed https://t.co/1chrwfw01q #WIvInd
— BCCI (@BCCI) August 14, 2019
वेस्ट इंडीज – इव्हिन लुईस, ख्रिस गेल, शाय होप (यष्टिरक्षक), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमेयर, रोस्टन चेस, जेसन होल्डर (कर्णधार), कार्लोस ब्रेथवेट, फॅबियन ऍलेन, किमो पॉल, केमार रोच.
3rd ODI. West Indies XI: C Gayle, E Lewis, S Hope, S Hetmyer, N Pooran, R Chase, J Holder, C Brathwaite, F Allen, K Paul, K Roach https://t.co/1chrwfw01q #WIvInd
— BCCI (@BCCI) August 14, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–इंग्लंडला पराभूत करत टीम इंडिया ठरली चॅम्पियन!
–या दिवशी होणार टीम इंडियासाठी मुख्य प्रशिक्षकाची घोषणा
–विराट कोहलीची माफी मागत डेल स्टेनने केली निवड समीतीवर टीका