---Advertisement---

वेस्ट इंडीजच्या धडाकेबाज खेळाडूला आवडते ‘भेंडी’, तर ‘या’ बॉलिवूड सुपरस्टारचा आहे दीवाना

On: शनिवार, मार्च 12, 2022 6:32 PM
Jason-Holder
---Advertisement---

वेस्ट इंडीच संघाचा ३० वर्षीय अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरला (Jason Holder) आयपीएलच्या १५ व्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाने विकत घेतले आहे. २०२२ च्या हंगामात लखनऊ फ्रॅंचायझीने वेस्ट इंडीज संघाच्या या खेळाडूला ८.७५ कोटी देऊन विकत घेतले आहे. सध्या तो जबदरदस्त कामगिरी करत आहे. त्यामुळे आता तो आयपीएल २०२२ मध्ये उत्तम खेळी खेळताना दिसण्याची शक्यता आहे. यावर्षीची आयपीएल स्पर्धा २६ मार्चपासून सुरू होणार असून या हंगामात ८ नव्हे, तर १० संघ खेळताना दिसणार आहेत.

आयपीएल २०२२ पूर्वी वेस्ट इंडीज संघाचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरने भारताप्रती आपले प्रेम व्यक्त केले आहे. तो म्हणाला की, त्याला भारतीय पदार्थांमध्ये सर्वात जास्त भेंडी आवडते. त्याचा आवडता बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान आहे. त्याने यामागचे कारण सांगितले आहे की, तो जेव्हा केकेआरसाठी खेळत होता, तेव्हा शाहरुख खान संघाच्या मालकांपैकी एक होता. त्यामुळे त्याला शाहरुख आवडतो. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जेसन होल्डरने आयपीएल या देशांतर्गत सर्वाधिक मोठ्या लीगमध्ये २६ सामने खेळले होते. १६ डावात १४.५ च्या सरासरीने १८९ धावा केल्या आहेत. त्याची फलंदाजीत सर्वोत्कृष्ट खेळी नाबाद ४७ धावा ही आहे. होल्डरने आयपीएलमध्ये आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने आयपीएलमध्ये २६ सामन्यांत २६ डावात २२.४ च्या सरासरीने ३५ विकेट घेतल्या आहेत. त्याची सर्वोत्कृष्ट खेळी ५२ धावा देत ४ विकेट घेणे ही आहे.

आयपीएलचा १५ वा हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. यावर्षीच्या हंगामात १० संघ खेळताना दिसणार आहेत. लीगचे सर्व सामने मुंबई आणि पुणे येथे खेळले जाणार आहेत. अंतिम सामना २२ मे ला खेळला जाणार आहे. आयपीएलच्या प्ले ऑफच्या सामन्यांचे स्थान निश्चित झाले नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

तब्बल १० वर्षानंतर भारतीय क्रिकेटमध्ये घडली ही घटना; बेंगलोर कसोटीत मयंक धावबाद होताच…

सहावी ओव्हर, सहावा चेंडू, रोहितचा षटकार अन् दर्शकाचं नाक; थेट रुग्णालयात करावं लागलं दाखल

Video: मुंबई इंडियन्सची नवी ‘आपली जर्सी’ पाहिली का? लई भारी दिसतेय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---