---Advertisement---

वेस्ट इंडिजचा दिग्गज काळाच्या पडद्याआड, भारताविरुद्ध एका कसोटी डावात घेतल्या होत्या ५ विकेट्स

On: गुरूवार, जून 2, 2022 2:59 PM
West-Indies
---Advertisement---

वेस्ट इंडिज संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू डेविड होलफर्ड (David Holford) यांचे वयाच्या ८२व्या वर्षी बारबाडोस येथे निधन झाले. वेस्ट इंडिज क्रिकेटच्या (WindiesCricket) ट्विटर अकाउंटवरून होलफर्ड यांना श्रद्धाजंली अर्पण करणारे ट्विट करत ही माहिती देण्यात आली आहे. १९६६ ते १९७७ दरम्यान फिरकीपटू आणि खालच्या फळीतील तुफानी फलंदाज म्हणून होलफर्ड प्रसिद्ध होते.

होलफर्ड यांनी त्यांच्या कारकिर्दीत २४ कसोटी सामने खेळले. यामध्ये त्यांनी २२.५८ च्या सरासरीने ७६८ धावा केल्या होत्या. ज्यात त्यांची नाबाद १०५ ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. त्यांचे शतक १९६६ मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध झाले होते, ज्यामध्ये त्यांनी गॅरी सोबर्ससह २७४ धावांची भागीदारी केली होती. आपल्या तिसऱ्या कसोटी डावात, हॉलफोर्ड यांनी नाबाद १०५ धावा करून वेस्ट इंडिजला दुसऱ्या पराभवापासून वाचवले होते. १९७६ मध्ये केनिंग्टन ओव्हल येथे भारताविरुद्ध पहिल्या डावात २३ धावा देत ५ बळी घेत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली होती.

“डेव्हिड हॉलफोर्ड यांनी मैदानावर आणि मैदानाबाहेर क्रिकेटच्या मूल्यांचे प्रतीक बनवले आणि ते वेस्ट इंडिजचे उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि राजदूत होते. एक खेळाडू म्हणून ते एक अव्वल दर्जाचे अष्टपैलू आणि कर्णधार होते, ज्यांनी सर्व स्तरांवर आपले सर्वोत्तम दिले. प्रशासक, संघ व्यवस्थापक आणि खेळपट्टी क्युरेटर या नात्याने त्यांनी खेळावरील त्यांचे असलेले प्रेम सतत त्यांच्या दूरदृष्टीने आणि समर्पणाने दाखवून दिले. केवळ क्रिकेटमध्येच नव्हे तर इतर अनेक क्षेत्रांतील अनेक तरुण खेळाडूंच्या विकासात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे डेव्हिड यांचा वारसा बार्बाडोस आणि वेस्ट इंडीज क्रिकेटसाठी सेवा आणि समर्पण आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटतर्फे त्यांच्या पत्नी मारवा आणि सर्व कुटुंबीय आणि मित्रांप्रती आम्ही मनापासून शोक व्यक्त करतो.” असं म्हणत वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रिकी स्केरिट (Ricky Skerritt) यांनी होलफर्ड यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

दरम्यान, होलफर्ड यांनी बार्बाडोस संघाचे कर्णधारपदही भुषवले आहे. त्यांनी संघाला शेफिल्ड शिल्डचे विजेतेपद मिळवून दिले. शिवाय त्रिनिदाद आणि टोबॅगोसाठी ते काही काळ खेळले. निवृत्तीनंतर होलफोर्ड यांनी खेळात अनेक भूमिका बजावल्या. ते स्पार्टन क्लबचे अध्यक्ष, बार्बाडोस क्रिकेट असोसिएशनचे संचालक, वेस्ट इंडिजचे निवडक आणि वेस्ट इंडिज संघाचे व्यवस्थापक होते.

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘महिला आयपीएल’चा मुहूर्त ठरला! सीएसकेची वुमन्स टीमही स्पर्धेत उतरण्याच्या तयारीत

चुना लगा दिया! गांगुलीच्या बीसीसीआय अध्यक्षपद राजीनामाच्या प्रँकनंतर चाहत्यांकडून मीम्सची बरसात

धोनीला टीम इंडियात खेळण्याची संधी कशी मिळाली? स्वत: माहीनेच केलाय खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---