साउथ आफ्रिका क्रिकेट संघाला वेस्ट इंडीज कडून पहिल्या सामन्यात पराभवास सामोरे जावं लागलं आहे. येणाऱ्या टी20 विश्वचषकापूर्वी वेस्ट इंडीजनं साउथ आफ्रिकेला धक्का दिला आहे. अटीतटीच्या सामन्यात वेस्ट इंडीजनं 28 धावांनी पाहुण्या संघास मात दिली आहे. या विजयानं वेस्ट इंडीजनं विश्वचषकापूर्वी सर्व देशातील संघांना “आम्हाला कमी लेखण्याची चूक करु नका” असा एक प्रकारचा संदेश दिला आहे.
तत्पूर्वी साउथ आफ्रिकेनं टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजनं मर्यादित 20 षटकात 8 गडी गमावून 175 धावा केल्या. संघाकडून सर्वाधिक धावा ब्रँडन किंगनं 6 चाैकार 6 षटकारच्या जोरावर 45 चेंडूत 79 धावा केल्या. तर काइल मेयर्सनं (34) आणि रोस्टन चेजनं (32) धावांची महत्वपूर्ण खेळी खेळली. यांशिवाय इतर कोणत्याही खेळाडूंना दूहेरी धावसंख्या देखील पार करता आली नाही.
धावांचा पाठलाग करताना साउथ आफ्रिकेची फलंदाजी फ्लाॅप ठरली. रिझा हेंड्रीक्स शिवाय दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला मोठी धावसंख्या करता आली नाही. हेंड्रीक्सनं 51 चेंडूत 87 धावा ठोकल्या. ज्यामध्ये 6 चाैकार 6 षटकारांचा समावेश आहे. पण समोरुन हेंड्रीक्सला कोणत्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही. त्यामुळे संपूर्ण संघ 19.5 षटकांत 147 धावांवरती बाद झाला. वेस्ट इंडीजकडून मॅथ्यू फोर्ड आणि गुडाकेश मोती दोघांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले. आणि संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. 3 टी20 सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडीजनं 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
वेस्ट इंडीज आणि साउथ आफ्रिका दोन्ही संघांचे प्रमुख खेळाडू सामन्यासाठी उपल्बध नव्हते. दोन्ही संघातील प्रमुख खेळाडू सध्या आयपीएलच्या स्पर्धेत व्यस्त आहेत. साउथ आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेन, एडन मार्करम, डेव्हीड मिलर उपल्बध नाहीत तर दुसरीकडे वेस्ट इंडीजकडून आंद्रे रसल, शिमरन हेटमायर, राॅवमन पाॅवेल हे खेळाडू उपल्बध नाहीत.
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2025च्या हंगामात महेंद्र सिंह धोनी चेन्नईकडून खेळताना दिसणार का?
फायनलसाठी कोणाला मिळणार तिकीट राजस्थान की हेदराबाद?
भारत-पाकिस्तान सामन्याचं तिकिट 16 लाख रुपये, तर सर्वात स्वस्त सुमारे 25 हजार रुपये…