क्रिकेटमध्ये एका षटकात सहा षटकार मारणे ही खूप मोठी गोष्ट समजली जाते. ही कामगिरी पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. वेस्ट इंडिज आणि मुंबई इंडियन्स संघाचा माजी खेळाडू ड्वेन स्मिथने एका क्लब सामन्यादरम्यान एकाच षटकात ६ षटकार ठोकले. ही कामगिरी त्याने आपला भाऊ केमार स्मिथच्या गोलंदाजीवर केली. ड्वेनने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना मार्च २०१५ मध्ये युएईविरुद्ध खेळला होता.
बार्बाडोज येथील ब्रिज टाऊन मैदानावर मंगळवारी (१ डिसेंबर) ईडन लॉज विरुद्ध CRB संघात एरॉल होल्डर टी१० लीगमधील सामना झाला. यादरम्यान लॉज संघाकडून खेळताना ३७ वर्षीय स्मिथने आपल्या भावाच्या पहिल्याच षटकात हा कारनामा केला. त्यानंतर तो अधिक काळ मैदानावर टिकला नाही आणि तो तंबूत परतला. त्याला ६ षटकार ठोकल्यानंतर केवळ दहाच धावा करता आल्या.
https://twitter.com/gnanajebin_/status/1333655004154974209
इतकेच नाही, तर स्मिथच्या गोलंदाजीवर केमारला आपला बदला घेण्याची संधी होती. परंतु ड्वेनने त्याला पहिल्याच चेंडूवर बाद केले. केमारबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत एकही प्रथम श्रेणी सामना खेळलेला नाही. तरीही व्यावसायिक इंग्लिश क्रिकेटमध्ये या खेळाडूने भाग घेतला आहे.
ए एँड ए ऑटो पार्ट्स एरॉल होल्डर टी१० क्लासिक ही एक स्पर्धा असून बार्बाडोज क्रिकेट असोसिएशनने मान्यता दिली आहे. सोबतच वेस्ट इंडिज किंवा बार्बाडोजचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या अनेक खेळाडूंचा यामध्ये सहभाग आहे.
ड्वेनने आतापर्यंत १० कसोटी सामने, १०५ वनडे सामने आणि ३३ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये कसोटीत त्याने २४.६१ च्या सरासरीने ३२० धावा केल्या होत्या. वनडेत त्याने १८.५७ च्या सरासरीने १५६० धावा केल्या होत्या. सोबतच टी२०त त्याने १८.१८ च्या सरासरीने ५८२ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
परदेशातील सलग दुसरा ‘क्लीन स्वीप’ वाचवण्यासाठी टीम इंडिया देणार ऑस्ट्रेलियाला टक्कर
‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया बीसीसीआयला घाबरते’, ऑस्ट्रेलियाच्या चॅनल ७ ची कोर्टात धाव
Video: आयपीएल २०२० मध्ये एकही सामना खेळायला न मिळालेल्या फलंदाजाची कमाल; ५५ चेंडूत ठोकले दीडशतक
ट्रेंडिंग लेख-
नादच खुळा! ऑस्ट्रेलिया दौर्यात एकाच टी२० मालिकेत सर्वात जास्त विकेट्स घेणारे ३ भारतीय शिलेदार
भारताविरुद्ध वनडेत सलग ३ शतके झळकविणारे फलंदाज, पाकिस्तानच्या २ खेळाडूंचाही समावेश
भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत सर्वाधिक शतके ठोकणारे ३ धडाकेबाज फलंदाज