---Advertisement---

गेल दिसला अनोख्या अंदाजात; ‘पंजाबी डॅडी’ लूक होतोय व्हायरल 

On: बुधवार, मे 26, 2021 12:07 AM
---Advertisement---

वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस हा आपल्या विनोदी स्वभावसाठी नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी गेलने टॉय कार सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यावर ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरने मजेशीर प्रतिक्रिया देखील दिली होती. गेल सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला असून यावेळी देखील कारण आहे ते त्याचा वायरल फोटो आहे.

या वेळी गेल हा ‘पंजाबी डॅडी लूक’ मुळे चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. गेलने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो पगडी घालताना दिसत आहे. गेलने हा फोटो शेअर करत लिहिले आहे की, “उद्याच्या शूटिंगची आणखी वाट पाहू शकत नाही. मी पंजाबी डॅडी होणार आहे.”

Photo Courtesy: Instagram/chrisgayle333

गेलची ही अनोखी स्टाईल पाहून चाहतेही खूप खूश आहेत. अल्पावधीतच हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल झाला असून, चाहत्यांनी देखील त्यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

‘युनिव्हर्स बॉस’ म्हणून ओळख असणारा गेल आपल्या आक्रमक फलंदाजीच्या शैलीसाठी संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे. गेल हा एबी डिव्हिलियर्स प्रमाणे भारतातील सर्वाधिक लोकप्रिय परदेशी खेळाडूंपैकी एक आहे. गेल सोशल मीडियावर देखील खूप मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव असतो व त्याला चाहत्यांच्या संपर्कात रहायला आवडते.

गेला हा आयपीएल 2021 स्पर्धेमध्ये पंजाब किंग्ज संघाचा सदस्य होता. मात्र आयपीएल 2021 स्पर्धा रद्द झाल्यामुळे , गेल आता थेट आगामी काळात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत मैदानात दिसण्याची शक्यता आहे. गेल हा टी20 क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गणला जातो.

महत्त्वाच्या बातम्या –

क्वारंटाईनमध्ये वेळ घालवण्यासाठी चेतेश्वर पुजाराला मिळाली सर्वात ‘क्यूट’ गेमिंग पार्टनर, पाहा फोटो

जेव्हा विराट कोहलीने सांगितले होते, ‘जडेजा आहे सर्वात खोटारडा व्यक्ती’; जुना व्हिडिओ होतोय व्हायरल

अन् कपड्यानिशी शॉवर घ्यायला गेला रसल, तीन वर्षापूर्वीच्या ‘त्या’ घटनेचा केला उलगडा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---