भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा ६८ धावांनी पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. वनडेतील तिन्ही सामने गमावल्यानंतर वेस्ट इंडिज संघाकडून टी२० मध्ये चांगली कामगिरी अपेक्षित होती, मात्र वेस्ट इंडिज संघाला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरा सामना १ ऑगस्ट रोजी सेंट किट्स येथील वॉर्नर पार्क मैदानावर खेळला जाणार आहे. मात्र, एका अनपेक्षित कारणाने आता हा सामना नियोजित वेळापत्रकापेक्षा उशिराने सुरू होईल.
उभय संघातील तीन सामन्यांची वनडे मालिका त्रिनिदाद येथे पार पडली होती. तसेच वनडे मालिकेतील पहिला सामनाही याच ठिकाणी खेळला गेला. त्यानंतर आता मालिकेतील पुढील दोन सामने सेंट किट्स येथील वॉर्नर पार्क मैदानावर खेळले जातील. १ ऑगस्ट रोजी मालिकेतील दुसरा सामना हा भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होणार होता. मात्र, आता हा सामना दोन तास उशिराने सुरू होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना आता रात्री १० वाजता सुरू होईल.
*CWI STATEMENT* Delayed start time for 2nd Goldmedal T20I Cup match, powered by Kent Water Purifiers | New Start Time: 12:30PM AST (11:30am Jamaica/10pm India)https://t.co/q1J5FBdZAh https://t.co/dy59uajSr8
— Windies Cricket (@windiescricket) August 1, 2022
दोन्ही संघांनी नुकताच त्रिनिदाद ते सेंट किट्स असा प्रवास केला. मात्र, खेळाडूंचे महत्त्वाचे साहित्य अद्याप पोहोचले नसल्याने सामन्याला उशीर होणार आहे. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने याबाबत अधिकृतपणे माहिती दिली. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने ट्विट करत लिहिले,
‘खेळाडूंचे साहित्य घेऊन येणारे वाहन उशिरा येणार असल्याने दुसऱ्या सामन्याला उशीर होईल. हा सामना दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी (वेस्ट इंडिज प्रमाण वेळेनुसार) सुरू होईल. आमच्या प्रसारणकर्त्यांना व चाहत्यांना झालेल्या या सुविधेबाबत आम्ही दिलगिर आहोत.’
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
CWG 2022 | कॉमनवेल्थ गेम्समध्ये सायकलस्वारांनी सोडला ट्रॅक, पाहा भीषण अपघाताचा व्हिडिओ
न्यूझीलंड कर्णधाराच्या मनात निवृत्तीचा विचार? दिले स्पष्टीकरण
पहिल्या टी-२० विजयानंतर टीम इंडियाचा विशेष सन्मान, रोहितला मिळाले स्पेशल गिफ्ट