सध्या पाकिस्तानचा संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्टइंडिज दौऱ्यावर आहे. यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात वेस्टइंडीजने १ गडी राखून दमदार विजय मिळवला. त्यानंतर शुक्रवारी (२० ऑगस्ट) वेस्टइंडिज विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली होती. पहिल्या दिवशी पाकिस्तान संघाची सुरुवात अत्यंत खराब राहिली होती.
त्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम आणि फवाद आलम यांनी पाकिस्तान संघाचा डाव सावरला. पहिल्या दिवसानंतर पाकिस्तानची धावसंख्या २१२ वर ४ विकेट्स अशी होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या सततच्या पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे चाहते चांगलेच नाराज झाले होते.
दुसरीकडे आपल्या मस्करीच्या अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या वेस्टइंडीजच्या खेळाडूंनी मात्र, आपलाच क्रिकेट सामना भरवला. वेस्टइंडिजच्या खेळाडूंचा त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये त्यांच्यातीलच खेळाडूंसोबत क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
वेस्टइंडीज क्रिकेट बोर्डाने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये चेमार होल्डर गोलंदाजी करत आहे, तर त्याच्यासमोर जोमेल वारीकन फलंदाजी करत आहे. यामध्ये चेमारच्या चेंडूवर जोमेल पायचित झाल्यानंतर चेमारने जोराने पंच बनलेल्या शमराह ब्रुक्सकडे अपील केली. यानंतर ब्रुक्सने फलंदाजाला मुद्दामून बाद दिले.
ज्यानंतर फलंदाज जोमेलने यासाठी थर्ड अंपायर झालेल्या जेसन होल्डरकडे रिव्यू घेण्याची मागणी केली. तेव्हा इतर खेळाडूंनी बॉल ट्रॅकिंगचा रिप्ले घडवून आणला. जसे की आपण या व्हिडिओत पाहू शकतो. यानंतर थर्ड अंपायर झालेल्या जेसन होल्डरने देखील फलंदाजाला बाद दिले. अशाप्रकारे वेस्टइंडीज संघाने दुसऱ्या दिवशीच्या पावसाच्या व्यत्ययामुळे ड्रेसिंग रूममध्येच मजा मस्ती केली.
Oh and Shamarh Brooks is the on field umpire! 🤣
— Windies Cricket (@windiescricket) August 21, 2021
दरम्यान, दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी वेस्टइंडीजने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय अगदी योग्य ठरला. पाकिस्तानने अवघ्या २ धावांमध्येच आपले ३ फलंदाज गमावले, ज्यामुळे पाकिस्तानचा डाव डगमगला होता.
मात्र, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने चांगली खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याच्या जोडीला फवाद आलमने देखील त्याची साथ निभावत दोघांनीही अर्धशतकीय खेळी केली. नंतर दुसऱ्या दिवशी सततच्या पावसामुळे खेळ झाला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवसांनंतरही पाकिस्तानची धावसंख्या २१२ वर ४ अशी राहिली.
महत्वाच्या बातम्या –
–आरारारा खतरनाक! चेन्नई सुपर किंग्जची सुपर डुपर बस दुबईत सज्ज, आता प्रतिक्षा फक्त…
–मुंबई इंडियन्सच्या सरावाचा श्रीगणेशा, ५५ सेंकदाचा व्हिडिओ शेअर करत दिली माहिती
–अफगाणिस्तानमधील अमेरिकन जवानामुळे स्टीव्ह स्मिथ होतोय ट्रेंड, वाचा नक्की काय आहे प्रकरण