---Advertisement---

WIvsIND । दोन पराभवानंतर टीम इंडियात मोठे बदल, जयस्वालला मिळाली पदार्पणाची संधी

On: मंगळवार, ऑगस्ट 8, 2023 7:36 PM
Yashasvi Jaiswal t20i debut
---Advertisement---

वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील तिसरा टी-20 सामना मंगळवारी (8 ऑगस्ट) गयानामध्ये खेळला जात आहे. या सामन्याची नाणेफेक वेस्ट इंडीज संघाने जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताया युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल या सामन्यात टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. नाणेफेक होण्याआधीच त्याला पदार्पणाची कॅप दिली गेली. 

ईशान किशन () याला या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवले गेले. पहिल्या दोन सामन्यात ईशान आणि शुबमन गिल डावाची सुरुवात करण्यासाठी आले होते. पण संघाला अपेक्षित सुरुवात देऊ शकले नाहीत. अशात तिसऱ्या सामन्यात संघ व्यवस्थापनाने यशस्वी जयस्वालला पदार्पणाची संधी दिली आहे. या सामन्यात जयस्वाल गिलसोबत डावाची सुरुवात करेल. यष्टीरक्षक संजू सॅमसन देखील मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरला होता. पण संघ व्यवस्थापानाने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम ठेवले आहे. अक्षर पटेलला तिसऱ्या टी-20 विश्रांती दिली जाणार, असे सांगितले जात होते. मात्र, अक्षर देखील या प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम आहे.

मालिकेतील पहिल्या दोन टी-20 सामन्यात यजमान वेस्ट इंडीज संघाने विजय मिळवला आहे. अशात भारतीय संघ 2-0 अशा अंतराने मागे आहे. तिसऱ्या सामन्यात भारताला कुठल्याही परिस्थितीत जिंकावे लागणार आहे, जेणेकरून त्यांचे मालिकेतील आव्हान कायम राहू शकले. मालिका जिंकण्यासाठी भारताला राहिलेले तिन्ही सामने जिंकावे लागतील.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
वेस्ट इंडीज – ब्रँडन किंग, काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, रोस्टन चेस, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅकॉय.

भारत – यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, कुलदीप यादव.
(West Indies won the toss & decided to bat first Yashasvi Jaiswal is making his T20I debut)

महत्वाच्या बातम्या –
‘राहुल भाई हार्दिकला सहकार्य करत नाही’, द्रविडच्याच सहकाऱ्याचा गंभीर आरोप
‘आमच्या रोहितला दाखवलंच नाही, सगळीकडे विराटच…’, Asia Cupच्या प्रोमोवर ‘हिटमॅन’च्या चाहत्यांची आगपाखड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---