वेस्ट इंडिज संघ सध्या भारत दौऱ्यावर (West Indies vs India) आहे. या दोन्ही संघांमध्ये नुकताच ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत ३-० ने जोरदार विजय मिळवला. पूर्णवेळ कर्णधार म्हणून ही रोहित शर्माची (Rohit sharma) पहिलीच मालिका होती. परंतु या मालिकेत पूर्णपणे फ्लॉप ठरलेल्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) फलंदाजीवर टीका केली जाऊ लागली आहे. दरम्यान कर्णधार रोहित शर्माने त्याचा बचाव करत टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. त्याने आपले शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक २०१९ मध्ये झळकावले होते. त्यानंतर त्याला एकही शतक झळकावता आले नाहीये. नुकताच वेस्ट इंडिज संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत देखील त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्याने ३ सामन्यात केवळ २६ धावा केल्या. यामध्ये पहिल्या सामन्यात त्याने ८, दुसऱ्या सामन्यात १८ आणि तिसऱ्या सामन्यात त्याला एकही धाव करता आली नाही.
सामना झाल्यानंतर विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर रोहित शर्मा उत्तर देत म्हणाला की, “विराटला आत्मविश्वासाची गरज आहे का? काय बोलताय तुम्ही? विराटच्या फॉर्मची आम्हाला चिंता नाही. शतक न करणे ही वेगळी बाब आहे. त्याने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या ३ सामन्यात दोन अर्धशतके झळकावली होते. त्यामुळे त्याची काही चूक आहे असे मला वाटत नाही. संघ व्यवस्थापनाला त्याच्या फॉर्मची चिंता नाही. खेळाडू आणि वैयक्तिकरित्या आम्हाला माहित आहे की आम्हाला कशावर लक्ष केंद्रित करायचे आहे.”
https://twitter.com/_ratna_deep/status/1492214102231781376?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1492214102231781376%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-virat-needs-any-confidence-what-are-you-talking-about-we-are-not-worried-about-virat-form-says-captain-rohit-5796292.html
https://twitter.com/AbdullahNeaz/status/1492179527594033152?s=20&t=vTP5kOv7sQ-Mp0_D8P4QRw
रोहित शर्माने दिलेल्या सडेतोड उत्तरानंतर विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय टी२० संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे होते. या स्पर्धेतील सुरुवातीच्या काही सामन्यात रोहित शर्मा साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला होता. त्यावेळी पत्रकाराने विराटला, रोहित शर्माला बाहेर करून ईशान किशनला संघात स्थान देण्याचा सल्ला दिला होता. यावर विराट कोहलीने पत्रकाराला भन्नाट उत्तर दिले होते.
महत्वाच्या बातम्या :
आयपीएल मेगा ऑक्शनबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला कोणीही सांगणार नाही, घ्या जाणून एकाच क्लिकवर
INDvsWI – टीम इंडियाचा दमदार कर्णधार! मालिका विजयासह रोहितने पाडलीये विक्रमांची रास, वाचा
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिका बनलीये ऐतिहासिक; २७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडलाय