भारत आणि श्रीलंका यांच्यात पार पडलेल्या पहिल्या वनडे सामन्यात,पृथ्वी शॉ नावाचे वादळ आले होते. श्रीलंका संघाने दिलेल्या २६३ धावांचा पाठलाग करताना पृथ्वी शॉने आक्रमक फलंदाजी करताना भारतीय संघाला जोरदार सुरुवात करून दिली. त्याने अवघ्या २४ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. या खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देखील देण्यात आला होता. परंतु, या खेळी दरम्यान त्याच्या हेल्मेटवर जोरदार चेंडू लागला होता. त्यामुळे फिजिओला देखील मैदानात यावे लागले होते. यादरम्यान, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने त्याला काय सल्ला होता. याचा खुलासा त्याने सामन्यानंतर झालेल्या मुलाखतीत केला आहे.
श्रीलंका संघाने दिलेल्या २६३ धावांचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ ने सुरुवातीपासूनच तुफान फटकेबाजी करायला सुरुवात केली होती. परंतु पाचव्या षटकात दुष्मंता चमिराचा वेगवान बाऊन्सर चेंडू पृथ्वी शॉच्या हेल्मेटवर जाऊन धडकला होता. त्यानंतर, पुढच्या षटकात तो झेलबाद झाला होता.(What did coach Dravid after the ball hit the helmet)
सामना झाल्यानंतर झालेल्या मुलाखतीत पृथ्वी शॉ ला विचारण्यात आले होते की,हेल्मेटला चेंडू लागल्यावर राहुल द्रविडनी काही म्हटले का? या प्रश्नाचे उत्तर देत तो म्हणाला, “हेल्मेटवर चेंडू लागल्याने मला जास्त वेदना झाल्या नाहीत. मी आता ठीक आहे. तुम्ही विचारल्यानुसार राहुल सरांनी मला त्यावेळी काहीही म्हटले नव्हते.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मी माझा स्वाभाविक खेळ खेळण्यासाठी मैदानात उतरलो होतो आणि संथ गतीने येणाऱ्या चेंडूची वाट पाहत होतो. मला धावफलक हलते ठेवायचे होते. पहिल्या डावात ही खेळपट्टी चांगली होती. परंतु, दुसऱ्या डावात ही खेळपट्टी आणखी चांगली झाली होती. इथे मी गतीचा आनंद घेतला. असे होऊ शकते की, हेल्मेटला चेंडू लागल्यामुळे माझी एकाग्रता भंग झाली असेल.”
भारतीय संघाचा दणदणीत विजय
या सामन्यात श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना,५० षटक अखेर ९ बाद २६२ धावा केल्या होत्या.श्रीलंका संघाने दिलेल्या २६३ धावांचा पाठलाग करताना, भारतीय कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक ८६ धावांची खेळी केली. तर आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या इशान किशनने ५९ धावांची खेळी केली. हा सामना भारतीय संघाने ७ गडी राखून आपल्या नावावर केला. यासोबतच भारतीय संघाने या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
दुसऱ्या सामन्यात आणखी तयारीनिशी उतरणार भारतीय संघ, रणतुंगा यांना देणार चोख प्रत्युत्तर
स्टुअर्ट ब्रॉड की हार्दिक पंड्या; कोणाचा हेडबँड लूक हटके? दिग्गज खेळाडूने दिले ‘हे’ उत्तर