कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. याचा परिणाम २४ जुलैपासून टोकियोमध्ये सुरु होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धांवरही झाला आहे. या व्हायरसमुळे ऑलिंपिक स्पर्धा आता थेट एका वर्षासाठी रद्द करण्यात आल्या आहेत.
याव्यतिरिक्त वेस्ट इंडीज (West Indies) संघ इंग्लंड (England) दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ४ जूनपासून कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. परंतु या मालिकेलाही कोरोना व्हायरसचा फटका बसण्याची शक्यता आहे.
यादरम्यान वेस्ट इंडीजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्रावो (Dwane Bravo) म्हणजेच डीजे ब्रावो पुन्हा चर्चेत आला आहे. ब्रावोने २०१८मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतु आता ब्रावोने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे.
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. यादरम्यान कोरोना व्हायरसवरील ब्रावोचे गाणे सोशल मीडियावर तूफान धमाल करत आहे. ब्रावोने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ब्रावो डान्स करताना दिसत आहे.
https://www.instagram.com/tv/B-JH_HPHp7d/?utm_source=ig_web_copy_link
ब्रावोने हा व्हिडिओ पोस्ट करत लिहिले की, “माझ्या अनेक चाहत्यांनी मला कोरोना व्हायरसवर गाणे गाण्यासाठी सांगितले. आपल्याला माहिती आहे की सध्याची परिस्थिती खूप वाईट आहे. अशामध्ये आपण एकमेकांसाठी उभे राहून ही लढाई जिंकली पाहिजे. मी ज्या गोष्टीवर काम करत आहे, हा त्याचा एक नमुना आहे.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-जगातील पहिली क्रिकेट टीम, जी देणार आपला अर्धा पगार कोरोना बाधितांना
-विराट की धोनी? भारी कोण? शाहिद कपूरने घेतले हे नाव
-वनडे आणि कसोटीत असा पराक्रम करणारा सेहवाग जगातील एकमेव खेळाडू